For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनी कंपनी ‘अंता’ पुन्हा भारतात परतणार

06:14 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
चीनी कंपनी ‘अंता’ पुन्हा भारतात परतणार
Advertisement

गुरुग्राममध्ये पहिले स्टोअर सुरु करणार : 2027 पर्यंत जवळपास 10 स्टोअर्स खुली करणार

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

प्रसिद्धी चीनी स्पोर्ट्सवेअर कंपनीअंता स्पोर्ट्स प्रॉडक्ट्सपुढील महिन्यात भारतात पुनरागमन करणार आहे. कंपनी गुरुग्राममध्ये आपले पहिले स्टोअर उघडणार आहे. ही माहिती कंपनीचा भारतीय भागीदारब्रँडमॅन रिटेल लिमिटेडने दिली आहे.

Advertisement

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनी मार्च 2027 पर्यंत भारतात सुमारे 10 स्टोअर्स उघडण्याची योजना आखत आहे. ब्रँडमॅन रिटेलच्या संचालक काशिका मल्होत्रा यांच्या मते, अंताच्या कपड्यांची सरासरी किंमत सुमारे 8,000 असेल, ज्यामुळे ते एक प्रीमियम सेगमेंट बनेल. त्याच वेळी, शूजची किंमत सुमारे 9,000 ते 10,000 इतकी राहणार असल्याची माहिती आहे.

अंताचे भारतात 5 वर्षांनंतर पुनरागमन

काशिका मल्होत्रा म्हणाल्या की, कंपनीला भारतात मोठ्या वाढीची अपेक्षा आहे. अंता पाच वर्षांहून अधिक काळानंतर भारतात परत येत आहे. यापूर्वी, कंपनीने 2020 मध्ये भारतात एक स्टोअर उघडले होते, परंतु भारत-चीन संबंध बिघडल्यामुळे ते बंद करावे लागले होते. आता इलेक्ट्रिक कार आणि स्मार्टफोन सेगमेंटमध्ये दिसल्याप्रमाणे, भारतात चिनी ब्रँड्समध्ये ग्राहकांची आवड पुन्हा वाढली आहे. तसेच, दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. 2020 नंतर स्थगित करण्यात आलेली दोन्ही देशांमधील थेट विमानसेवा ऑक्टोबरमध्ये पुन्हा सुरू झाली आहे.

ते म्हणाले की, पूर्वी चीनबद्दल लोकांची धारणा हे एक मोठे आव्हान होते, परंतु आता अंताची जागतिक ओळख वाढली आहे.

 

Advertisement
Tags :

.