कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चिनी शस्त्रास्त्र देताहेत पाकिस्तानला दगा!

06:23 AM May 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निवृत्त ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांची माहिती

Advertisement

  जे-11 विमानांचीही भारताने केली शिकार : ‘तुर्की’च्या ड्रोनचाही भारतीय एअर डिफेन्सकडून खात्मा

Advertisement

ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून आपण पाकिस्तानचे नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्व हल्ले आपण यशस्वीरित्या परतवून लावले आहेत. पाकिस्तानकडे फायटर एअरक्राफ्टच्या माध्यमातून हल्ला करण्याची क्षमता नाही. मग ते ड्रोन अथवा शॉर्ट रेंज मिसाईलचा वापर करून हल्ला करीत आहेत. त्यातून आपली जी विमानतळे पाकिस्तान सीमारेषेच्या जवळ आहेत, मग त्यात पंजाब, जम्मू काश्मीर, राजस्थान अथवा गुजरातमधील काही विमानतळ आहेत, तेथे हल्ल्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. मात्र, त्यांना तिथपर्यंत पोहोचू न देता उद्धवस्त करण्याचे काम आपण यशस्वीरित्या करतोय, असे निवृत्त ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, आपली इंटीग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टीम आहे. त्या सिस्टीममध्ये रडार, ड्रोन सॅटेलाईट यंत्रणेच्या माध्यमातून यावर लक्ष ठेवतात. सर्व्हेलन्सप्रमाणे माहिती एकत्रित केली जाते. टार्गेट काय आहे, ते बघून काउंटर अॅटॅक केला जातो. म्हणूनच पाकिस्तानची जेवढी वेपन्स आत येण्याचा प्रयत्न करत होती, ती सर्व बरबाद करण्याचं काम आपण केलेलं आहे. या पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात आपलं कुठलंही विमानतळ डॅमेज झालेलं नाही. भारताने पुन्हा प्रतिहल्ला करून त्यांची लाहोर, रावळपिंडी येथील विमानतळं उद्धवस्त केली आहेत. पाकिस्तानची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टिम बरबाद केली आहे. पाकिस्तानची जी ही सिस्टीम होती, ती चिनी बनावटीची होती. पाकिस्तान चिनी शस्त्रs घेऊन युद्धात उतरली आहे. जी शस्त्रs यापूर्वी युद्धात सिद्धता दाखवू शकलेली नाहीत. मात्र, पाकिस्तानचे या चिनी सिस्टीमने रक्षण केलेले नाही. यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झालेले आहे.

पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांमध्ये सीमावर्ती भागात आपले 16 नागरिक मारले गेलेत. पाकिस्तानच्या या हल्ल्याने भारतानेही तोफांच्या माध्यमातून प्रतिहल्ला केलेला आहे. त्या ठिकाणी सीमेवर घमासान लढाई सुरू आहे येणाऱ्या काळात काय होते ते आपल्याला कळेल. पण आज पाकिस्तानची जी ड्रोन क्षमता आहे, ती केवळ तुर्कस्तानवर अवलंबून आहे. तुर्कस्तान त्यांना ड्रोन पुरवितो. त्यामुळे ड्रोन व छोट्या मिसाईलचे हल्ले आपल्यावर पुन्हा होऊ शकतात. मात्र, आपली सिस्टीम सक्षम आहे. 24 तास अलर्ट राहवे लागेल. आपण सक्षमरित्या त्यांचा सामना करीत आहोत. आपल्या सिस्टीमने मिसाईल, ड्रोन युद्ध करीत पाकिस्तानचे सर्व ड्रोन उद्धवस्त करण्याचे काम करीत आहे. पाकिस्तानकडून खोट्या-नाट्या बातम्याही पसरवल्या जात आहे. ज्यात भारताची विमाने पाडली म्हणून खोट्या अफवा उठवल्या जात आहे. त्याविऊद्ध गुन्हाही दाखल झालेला आहे. आज पाकिस्तानचे स्टॉकमार्केट कोसळते आहे. तर दुसरीकडे भारताचे वाढते आहे. भारताची लढाई क्षमता फार मोठी आहे, म्हणूनच या युद्धामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा त्रास होणार असल्याचे श्री. महाजन म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article