For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनची झेंग विजेती

10:15 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
चीनची झेंग विजेती
Advertisement

टोकियो : डब्ल्यूटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या पॅन पॅसिफीक खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत चीनच्या टॉप सिडेड क्विनवेन झेंगने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना अमेरिकेच्या सोफीया केनीनचा पराभव केला. या विजेतेपदामुळे झेंगने पुढील महिन्यात होणाऱ्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या सातव्या मानांकित झेंगने केनिनचा 7-6 (7-5), 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा सामना 2 तास चालला होता. 2024 च्या टेनिस हंगामातील झेंगचे हे तिसरे विजेतेपद आहे. या जेतेपदामुळे झेंगने सौदी अरेबियातील रियाद येथे 2 नोव्हेंबरपासून खेळविल्या जाणाऱ्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.