For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनकडून सर्वात मोठ्या चुंबकाची निर्मिती

06:45 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
चीनकडून सर्वात मोठ्या चुंबकाची निर्मिती
Advertisement

चीनने न्यूक्लियर फ्यूजन तंत्रज्ञानात मोठे यश प्राप्त केले आहे. देशाच्या वैज्ञानिकांनी ‘आर्टिफिशियल सन’ म्हणजेच कृर्घ्मि सूर्यासाठी जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग मॅग्नेट निर्माण केला आहे. याचे यशस्वी परीक्षण देखील झाले आहे. यामुळे भविष्यात फ्यूजन एनर्जी विकसित करण्याच्या दिशेने मदत मिळेल असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

Advertisement

आर्टिफिशियल सन एक असे यंत्र आहे, ज्यात सूर्याप्रमाणेच ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यात अत्यंत तप्त वायू म्हणजेच प्लाझ्मा निर्माण केला जातो. तो नियंत्रित करण्याचा प्रयत्न होतो, जेणेकरून ऊर्जा निर्माण होऊ शकेल. या तंत्रज्ञानाला न्यूक्लियर फ्यूजन म्हटले जाते. जर हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले तर भविष्यात याच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.

सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग मॅग्नेट

Advertisement

चीनने या यंत्रासाटी जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग मॅग्नेट तयार केला आहे. याचे वजन 582 टन आहे, तर लांबी 21 मीटर, रुंदी 12 मीटर आणि उंची 3.3 मीटर आहे. या मॅग्नेटचे काम मशीनच्या आत असलेल्या तप्त प्लाझ्माला एकाचठिकाणी ठेवणे आहे, जेणेकरून ते मशीनच्या भिंतींना आदळू नये. जर असे घडले तर ऊर्जा तयार करण्याची प्रक्रिया थांबू शकते. हा मॅग्नेट आंतरराष्ट्रीय फ्यूजन प्रोजेक्ट आयटीईआरमध्ये वापरण्यात येणाऱ्या अशाच मॅग्नेटपेक्षा सुमारे 1.3 पट मोठा आहे. यात तीन पट अधिक ऊर्जा जमा केली जाऊ शकते. तर पुढील काळात अशाप्रकारचे 16 मॅग्नेट एकत्रित लावण्यात येणार आहेत.

आणखी एक उपकरण

वैज्ञानिकांनी एक खास सुपरकंडक्टिंग कॉयल देखील तयार केली आहे. याचे काम फ्यूजन प्रक्रिया सुरू करणे आणि प्लाझ्माला पूर्णवेळ योग्य ठिकाणी कायम राखणे आहे. परीक्षणादरम्यान या कॉयलने 60 किलोएम्पियर करंट आणि 6.03 मेगाजूल एनर्जी सांभाळण्याची क्षमता दर्शविली आहे. हे दीर्घकाळापर्यंत रिअॅक्टर संचालित करण्यास मदत करणार असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

महत्त्वपूर्ण कामगिरी

या दोन्ही उपकरणांचे सर्व आवश्यक हिस्से चीनमध्येच निर्माण करण्यात आले आहेत. यामुळे या तंत्रज्ञानासाठी आता इतर देशांवरील निर्भरता कमी झाली असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. हे पाऊल भविष्यात स्वच्छ आणि निरंतर ऊर्जा निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाला पुढे नेण्यास मदत करणार असल्याचे तज्ञांचे मानणे आहे.

Advertisement
Tags :

.