चीनने 44 वर्षांनी डागले आयसीबीएम
अमेरिका, फिलिपाईन्स, तैवानच्या चिंतेत वाढ
वृत्तसंस्था/ बीजिंग
दक्षिण चीन समुद्रात सुरू असलेल्या तणावादरम्यान चीनने अमेरिकेपर्यंत विध्वंस घडवून आणणारे आंतरमहाखंडीय क्षेपणास्त्र डीएफ-41चे परीक्षण केले आहे. चीनचे सैन्य पीएलएने बुधवारी सकाळी हे परीक्षण पार पाडले आहे. 44 वर्षांनी चीनच्या सैन्याने उघडपणे आंतरमहाखंडीय क्षेपणास्त्राचे परीक्षण केले आहे. फिलिपाईन्स आणि अमेरिकेचा नौदल तळ गुआमजवळून गेलेले हे क्षेपणास्त्र प्रशांत महासागरात कोसळले आहे. या क्षेपणास्त्रात एक नकली पेलोड लादण्यात आला होता. चीनच्या या डीएफ-41 क्षेपणास्त्राला 2017 मध्ये सैन्याच्या ताफ्यात सामील करण्यात आले होते आणि याचा मारक पल्ला 12 हजारांपासून 15 हजार किलोमीटर अंतरापर्यंतचा आहे.
चीनचे हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र अमेरिकेच्या मुख्य भूमीत मोठी हानी घडवून आणण्याची क्षमता राखते. एका आंतरमहाखंडीय क्षेपणास्त्राचा मारक पल्ला सर्वसाधारणपणे 5500 किलोमीटरपर्यंतचा असतो आणि ते अण्वस्त्र वाहून नेण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आले असते.
पीएलएच्या रॉकेट फोर्सने यशस्वीपणे या क्षेपणास्त्राचे परीक्षण पेले आहे. हे क्षेपणास्त्र पूर्वनिर्धारित भागात अचूकपणे समुद्रात कोसळले आहे. हे क्षेपणास्त्र परीक्षण वार्षिक सैन्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत करण्यात आले आहे. यात शस्त्रास्त्रांची कामगिरी आणि सैनिकांच्या प्रशिक्षणाचे प्रभावीपणे परीक्षण करण्यात आल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
चीनने या परीक्षणासंबंधी सर्व संबंधितांना कल्पना दिली होती. चीनने 44 वर्षांनी सागरी क्षेत्रात आंतरमहाखंडीय क्षेपणास्त्राचे परीक्षण पेले आहे. यापूर्वी मे 1980 मध्ये चीनने डीएफ-5 चे परीक्षण पेले होते. चीनच्या या पहिल्या आंतरमहाखंडीय क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 9 हजार किलोमीटरचा होता. तर चीनचे नवे परीक्षण हे पूर्ण आशिया-प्रशांत क्षेत्रात क्षेपणास्त्रांशी निगडित हालचालींमध्ये मोठी वाढ झाली असताना केले आहे. यापूर्वी उत्तर कोरियाने कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले होते. हे क्षेपणास्त्र जपाननजीकच्या समुद्रात कोसळले होते.
तर एप्रिल महिन्यात अमेरिकेने फिलिपाईन्सनजीक स्वत:च्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला तैनात केले होते. 1987 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेने अशाप्रकारचे क्षेपणास्त्र आशिया-प्रशांत क्षेत्रात तैनात केले आहे. अमेरिका 2019 मध्ये आयएनएफ करारातून हटला आहे.
चीनकडे 350 आयसीबीएम
चीनने स्वत:च्या आंतरमहाखंडीय क्षेपणास्त्रांचे प्रमाण दुप्पट केले आहे. चीनकडे 350 आंतरमहाखंडीय क्षेपणास्त्रs असल्याचा अनुमान आहे. या क्षेपणास्त्रांसाठी चीन साइलोची निर्मिती करत आहे.