कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चीनकडून सर्वात उंच पूलाची निर्मिती

06:08 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ढगांच्या सान्निध्यातून धावणार वाहने

Advertisement

चीनने पुन्हा एकदा इंजिनियरिंगची कमाल करून दाखविली आहे. चीनच्या इंजिनियर्सनी जगातील सर्वात उंच पूल निर्माण केला आहे. चीनच्या हुआजियांगमध्ये जगातील सर्वात उंच पूलाचे थक्क करणारे ड्रोन फुटेज समोर आले आहे. हा पूल चालू वर्षात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. हुआजियांग ग्रँड कॅनियन ब्रिज लंडनच्या गोल्डन गेट ब्रिजपेक्षा 9 पट उंच आहे. तर पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा हा पूल उंचीत दुप्पट आहे.

Advertisement

चीनमध्ये निर्माण होत असलेला हा पूल इतका उंच आहे की निर्मितीकार्यादरम्यान त्याच्यासाथीने ढग जात असल्याचे व्हिडिओत दिसून येते. हा पूल बेइपन नदीवर निर्माण करण्यात आला आहे. हुआजियांग ग्रँड कॅनियन पूल 2.9 किलोमीटर लांब आणि नदीच्या 2050 फूट वर आहे. पूलाचा मध्यवर्ती भाग 93 हिस्स्यांनी निर्माण करण्यात आला आहे आणि याचे एकूण वजन 22 हजार टन आहे. हा आयफेल टॉवरच्या एकूण वजनाच्या तीनपट आहे. हा पूल स्वत:च्या उद्घाटनासोबतच विश्वविक्रम मोडण्यासाठी तयार आहे. परंतु वर्तमानात जगातील सर्वात उंच पूलाचा मान चीनकडेच आहे. हा गुइझोऊ प्रांतात बेइपानजियांग पूलाच्या नावावर आहे, जो हुआजियांग ग्रँड कॅनियन ब्रिजपेक्षा जवळपास 320 किलोमीटर उत्तर दिशेला आहे. चारपदरी वाहतुकीच्या या पूलाची निर्मिती 2016 मध्ये पूर्ण झाली होती आणि हे बेइपान नदीवर 1788 फूट उंच आहे.

हुआजियांग पूल खुला झाल्यावर स्थानिक लोकांना कनेक्टिव्हिटीमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या विशाल खोऱ्याला पार करण्यासाठी कमीतकमी 1 तास घालवावा लागतो, परंतु हा पूल खुला झाल्यावर लोक केवळ 3 मिनिटात हे अंतर पार करू शकतील. 29.2 कोटी डॉलर्सच्या खर्चातून निर्माण होणाऱ्या या पूलाचे काम 2022 मध्ये सुरू झाले होते आणि केवळ 3 वर्षांमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास तयार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article