For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : रहिमतपूरमध्ये ‘चिमुकल्यांची खाऊ गल्ली व बाल बाजार’ उपक्रम उत्साहात

05:53 PM Dec 24, 2025 IST | NEETA POTDAR
satara   रहिमतपूरमध्ये ‘चिमुकल्यांची खाऊ गल्ली व बाल बाजार’ उपक्रम उत्साहात
Advertisement

                                  रहिमतपूरमध्ये चार शाळांचा संयुक्त ‘खाऊ गल्ली’ उपक्रम

Advertisement

वाठार किरोली : रहिमतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रहिमतपूर क्रमांक १ यांच्या मैदानावर दि २० डिसेंबर रोजी 'चिमुकल्यांची खाऊ गल्ली व बाल बाजार हा अभिनव उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रहिमतपूर क्रमांक १, क्रमांक २, बेघर बस्ती शाळा तसेच जिल्हा परिषद उर्दू शाळा रहिमतपूर या चारही शाळांनी एकत्र येऊन सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन रहिमतपूर बीटच्या विस्तार अधिकारी मनिषा चंदुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

यावेळी वसंत दादा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खांडे, प्रकाश कदम, संतोष मांढरे, नंदा जाधव उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान बिस्तार अधिकारी मनिषा चंदुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.