"मिरची कागदात जोखणार अन् गुळाला चांगला भाव मिळणार"; वाकरेच्या ज्योतिर्लिंग यात्रेत भविष्याचा वेध
बिरदेव भक्त रंगराव हराळे यांनी वर्तवली आगामी काळाची भाकिते
माकरे: कलियुग जाणार बाळांनो, कलंकी येणार, मिरची र बाळांनो कागदात जोकणार, गुळाला धारण बाळानो ठेचला मरण, अशी भाकणूक बिरदेव भक्त रंगराव हराळे (खुपिरे) यांनी केली. वाकरे, ता. करवीर येथे जोतिलिंग चैत्र यात्रेनिमित आयोजित केलेल्या भाकणुकीत बिरदेव भक्त रंगराव हराळे यांनी वरील भाकिते केली.
बिरदेव भक्त रंगराव हराळे यांनी यावेळी कलियुग जाणार असल्याचे सांगून भविष्यात कलंकीचे युग येणार असल्याचे नमूद केले. तसेच मिरची महागणार असून गुळाला चांगला दर मिळणार. रोहिणीचा पेरा जसा मोतियाचा तुरा, मात्र म्हाताऱ्या पावसात नुकसान डोईल. सोन्याची कांडी भंगाला जाईल, तांबं मात्र महाग होईल, असेहीअसेही बिरदेव भक्त रंगराव हराळे हराळे यांनी आपल्या भाकणुकीत सांगितले. भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
चैत्र यात्रेनिमित्त सरपंच अश्विनी पाटील, उपसरपंच महादेव कांबळे,
गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवारांच्या उपस्थितीत जोतिबाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.