मिरची अन् ढब्बूही झाली तिखट
दोघांचेही दर शंभरावर आले, लसूण उतरली,प्रति लिंबू 8 ऊपयांवर
पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर वाढलेलेच आहेत. पणजी बाजारपेठेत सध्या मिरची आणि ढब्बूने शतक गाठले असून, 100 ऊपये प्रतिकिलोच्या दरात या दोन्ही भाज्या विकल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून आले व लसूणचे भावही गगनाला भिडले होते. त्याचे भाव आता पणजी बाजारपेठेत उतरले असून आले 120 ऊपये प्रतिकिलो तर लसूण 280 ऊपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. राज्यभरात गेल्या आठवड्यापासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. या पाश्वभूमीवर राज्यात लिंबू सरबत, लिंबू सोडाचे सेवन नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. परिणामी पणजी बाजारपेठेत प्रति लिंबू 8 ऊपयांमध्ये विकला जात आहे. या अगोदर 20 ऊपयांना 5 ते 6 लिंबू विकले जात होते. तसेच फलोत्पादन महामंडळाच्या दुकानावर प्रति लिंबू 5 ऊपये विकला जात आहे.