बाल लेखिका आदिती पुजारेची ग्रंथालयास दहा स्वलिखित पुस्तकांची भेट
ग्रंथपाल श्री.संजय शिंदे यांनी केली विशेष प्रशंसा
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मूळ पळसंब गावातील व सध्या मुंबईस्थित बाल लेखिका आदिती पुजारे हिने शनिवार, १७ मे रोजी दहावीपर्यंत लिहिलेली दहा स्वलिखित पुस्तके मालवण नगर वाचन मंदिर या ग्रंथालयाला भेट दिली. आदिती म्हणाली की, मला माझ्या शालेय अनुभवांच्या भावना मांडण्यासाठी मी लेखनाकडे वळले. पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रकाशक शोधले. 'In the Toxic World' हे तिचे पहिले पुस्तक आहे. कांदिवली येथील तिच्या प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी आपली पहिल्या पासूनची सगळी पुस्तके वाचली आहेत व प्रोत्साहीत केले आहे असेही तिने सांगितले.ग्रंथपाल संजय शिंदे यांनी आदितीची विशेष प्रशंसा केली आणि तिला ग्रंथभेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मालवण नगर वाचनालयाचे प्रमुख ग्रंथपाल संजय शिंदे, आदिती पुजारेचे वडील भालचंद्र पुजारे, सौ. दीपा कदम, सहाय्यक कर्मचारी रमाकांत जाधव व वाचनप्रेमी नागरिक उपस्थित होते.