महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चिमुरड्यांवर स्क्रीन पाहण्यास बंदी

06:45 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्वीडनने घेतला महत्त्वाचा निर्णय

Advertisement

युरोपीय देश स्वीडनने 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर स्क्रीन टाइमकरता पूर्णपणे बंद घातली आहे. स्क्रीनटाइममुळे मुलांवर प्रतिकूल प्रभाव पडत होता. अधिक स्क्रीनच्या वापरामुळे मुले आणि किशोरवयीनांमध्ये स्लीप डिसऑर्डर, एंक्झाइटी, डिप्रेशन आणि ऑटिजम होत असल्याचे अनेक अध्ययनात दिसून आले आहे. तसेच मुलांच्या शारीरिक क्रियांमध्ये घट झाली आहे. मुलांना टीव्ही आणि मोबाइल समवेत कुठल्याही स्क्रीनच्या वापराची अनुमती दिली जाऊ नये असे स्वीडन सरकारने स्पष्ट केले आहे.

Advertisement

अमेरिका, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स यासारख्या देशांनी यापूर्वीच मुलांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. फ्रान्समध्ये तर 3 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्क्रीन वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची योजना आहे.

किती तास पहावी स्क्रीन

2-5 वर्षांपर्यंतची मुले : दिवसात कमाल एक तास

6-12 वर्षांपर्यंतची मुली : दिवसात कमाल 2 तास

किशोरवयीन : दिवसात कमाल 3 तास

नेत्र मूल्यवान, ठेवा त्यांच्यावर नजर

दीर्घकाळापर्यंत स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवर डिजिटल तणाव, ड्राय आय डिसिज, मायोपिया म्हणजेच निकट दृष्टीदोषची समस्या निर्माण होऊ शवपे. चीन आणि कोरिया यासारख्या देशांमध्ये 50 टक्के मुलांमध्ये मायोपिया होत आहे. तर अधिक स्क्रीन टाइममुळे ऑटिजम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा धोका आहे. 2022 मध्ये जपानमध्ये झालेल्या एका अध्ययनात एक तासापेक्षा कमी स्क्रीन टाइममुळे तीन वर्षांच्या वयात एएसडीचा धोका 38 टक्के जोखिमीशी निगडित होता. तर दोन तासांपेक्षा अधिक स्क्रीन टाइमसोबत ही जोखीम तीनपट अधिक झाली होती. म्हणजेच जितका अधिक स्क्रीन टाइम तितका एएसडीचा धोका अधिक.

अधिक स्क्रीन टाइमचे तोटे

-अधिक स्क्रीन टाइमचा प्रभाव मनावर पडतो, नकारात्मक गोष्टी मेंदूत घर करून बसतात. याचा परिणाम मनावर पडतो.

-स्क्रीनची सवय मुलांमध्ये एंक्झाइटी निर्माण करते. मुलांच्या संतापात भर पडते. यामुळे मुले नीटपणे झोपू शकत नाहीत.

-एकाग्रतेत घट होत असून डिप्रेशनचे शिकार ठरत आहेत. चिडचिडेपणा किंवा निराशा जाणवू शकते.

-अधिक वेळ स्क्रीन पाहिल्यावर मुले सोशल होऊ शकत नाहीत, त्यांना काही सांगितल्यास ओरडू लागतात.

-अधिक स्क्रीन टाइम व्यक्तिमत्त्व विकासात अडथळा ठरतो. अभ्यासातही अडथळे निर्माण होतात.

उपाययोजना काय?

-मुलांना मोबाइल देऊ नका, त्यांच्यासोबत वेळ घालवा.

-वेळ काढणे जमत नसल्यास स्क्रीन लहान नसेल याची काळजी घ्या.

-मोठी स्क्रीन किंवा टीव्ही एक पर्याय, परंतु तो देखील अधिक वेळ नको.

-मोबाइल दिल्यास काय आणि कितीवेळ पाहतोय यावर नजर ठेवा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article