For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिकोडी बसवेश्वर संस्थेने ठेवीदारांची रक्कम परत द्यावी

12:25 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
चिकोडी बसवेश्वर संस्थेने ठेवीदारांची रक्कम परत द्यावी
Advertisement

कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

Advertisement

बेळगाव : चिकोडी येथील बसवेश्वर  सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून ठेवीदारांची 100 कोटी ऊपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संबंधित आरोपींना तत्काळ अटक करून न्यायालयात हजर करावे, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले. या प्रकरणात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून संबंधितांनी मोठ्या प्रमाणात ठेवीदारांकडून पैसे जमा करून त्याची परतफेड न करता फसवणूक केली आहे. या संदर्भात अनेक ठेवीदारांनी बेळगाव जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने ठेवीदारांच्या बाजूने आदेश दिले आहेत.

मात्र, या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने ठेवीदारांनी फौजदारी तक्रारी दाखल केल्या आहेत. क्रिमिनल कम्लेंट नं. 404/23 सह इतर प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहेत. असे असतानाही गेल्या 6 महिन्यांपासून पोलिसांकडून आरोपी सापडत नसल्याचे कारण देत अहवाल सादर केला जात असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल न्यायालयाने चिकोडी पोलीस स्थानकावर शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश दिले आहेत. दरम्यान सर्व आरोपींना तातडीने अटक करून ग्राहक न्यायालयासमोर हजर करावे व ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी अॅड. एन. आर. लातूर यांनी केली. निवेदनावर अंजलादेवी ढवळेश्वर, सुभाष बागेवाडी यांच्यासह अनेक ठेवीदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.