नागपूर येथील आदिवासी आरोग्य परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सहभाग
नागपूर : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे नागपूर येथे आयोजित शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आदिवासी आरोग्य संदर्भातील परिषदेत सहभागी झाले. यावेळी महाराष्ट्राचे आदिवासी कल्याणमंत्री अशोक उईके, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, तसेच एम्स नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत जोशी आदी मंडळी यावेळी उपस्थित होती. या कार्यशाळेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पुढाकर घेऊन या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक देखील केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासींकरिता देशात सर्वत्र पायाभूत सुविधा तसेच आदिवासींच्या आरोग्याची काळजी म्हणून आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्या. वनवासी कल्याण आश्रमसारख्या संस्था आदिवासींना वर काढण्यासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या प्रथा परंपरा यांचे जतन करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे विकसित भारत दृष्टिकोनातून विविध संघटनांनी सरकार बरोबर सहकार्य करावे आणि सरकारच्या आदिवासी कल्याण साठी असलेल्या विविध योजनांचा लाभ आदिवासी घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले व आयोजकांचे कौतुक केले.