For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री सुदिन ढवळीकरांची कोंडी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची खेळी

02:58 PM Jun 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंत्री सुदिन ढवळीकरांची कोंडी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची खेळी
Advertisement

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकरांचा दावा

Advertisement

पणजी : गोव्यातील वाढीव वीज बिले आणि स्मार्ट मीटरच्या नागरी प्रश्नाला आता सत्ताधारी भाजप युतीमधील अंतर्गत राजकीय संघर्षाचा रंग आला आहे. मगोपचे प्रमुख नेते आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे राजकीय पंख छाटण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच रणनीती आखून ज्येष्ठ मंत्री दिगंबर कामत यांना पुढे काढले आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर यांनी काल, रविवारी पत्रकार परिषदेत केला. पणजीतील पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश चोडणकर यांनी भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, मंत्री दिगंबर कामत यांच्यात स्वत:च्याच सरकारच्या वीज खात्याविरोधात जाण्याचे धाडस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या संमतीशिवाय असूच शकत नाही. मुख्यमंत्र्यांनीच सुदिन ढवळीकर यांना राजकीय कोंडीत पकडण्यासाठी कामत यांना हे धाडस पुरवले आहे.

मंत्रिमंडळात ताळमेळ नाही

Advertisement

भाजपच्या अनेक प्रकरणाचा दाखला देत काँग्रेसने भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोव्याच्या मंत्रिमंडळात कोणताही ताळमेळ नसून, जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी सत्ताधारी नेते एकमेकांचे पाय खेचण्यात आणि अंतर्गत राजकारणात मग्न आहेत, अशी टीका चोडणकर यांनी केली. वाढीव वीज बिलांमुळे जनता त्रस्त असताना सरकार मात्र अंतर्गत वादात व्यस्त असल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.

Advertisement
Tags :

.