पंतप्रधानांच्या सूचनांचे मुख्यमंत्र्यांकडून पालन
ताफ्यातील चार गाड्या केल्या रद्द : मंत्री, आमदारांचे विदेश दौरे बंद
पणजी : इराणविरोधात इस्रायल आणि अमेरिका यांनी चालविलेल्या युद्धाचा परिणाम भारतावर देखील झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऱ्या देशवासीयांना काटकसर करण्यास सांगून स्वत:पासून सुऊवात केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुऊवारी आपल्या ताफ्यातील तब्बल चार गाड्या रद्द केल्या. केवळ स्वत:ची कार आणि पोलिस पायलट कार, एवढ्याच गाड्या घेऊन ते कामे करू लागले आहेत. त्याचबरोबर त्यांनी सर्व अधिकारी आणि मंत्र्यांचे विदेश दौरे रद्द केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन मुख्यमंत्र्यांनी देखील काटकसरीला स्वत:पासून प्रारंभ केलाच शिवाय सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांनाही काटकसर करण्याचा आदेश दिला. पंतप्रधानांचा विचार पुढे नेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी उशिरा या प्रतिनिधीशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आपल्या गाड्यांचा जो ताफा आहे त्यातील चार गाड्या आपण रद्द केल्या आहेत. गुऊवारपासून आपण केवळ दोनच गाड्यातून पुढे जातो, एक स्वत:ची गाडी आणि दुसरी पोलिसांची पायलट गाडी. पंतप्रधानांनी राष्ट्रहितासाठी दिलेला विचार पुढे नेण्यासाठी आपण सुऊवात केलेली आहे.
सर्वांच्या खर्चात कपात
आपल्या सरकारने काटकसरीचे सर्व पर्याय ठेवले असून त्याकरिता एक एक आदेश जारी करण्यास प्रारंभ केला आहे. खर्चात कपात करण्यास सांगितले असून ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी सरकारी गाडीचा वापर केला जाईल.
सर्व विदेश दौरे रद्द
याशिवाय सर्व मंत्री, आमदारांचा सरकारी दौरा, विशेषत: विदेश दौरा रद्द केला आहे. पुढील आदेश येईपर्यंत सरकारी खर्चाने मंत्री असो वा आमदार किंवा सरकारी अधिकारी यांना विदेश दौरे करता येणार नाही. त्याचबरोबर या अगोदर मंजूरी दिलेले विदेशी दौरे देखील रद्द केले आहेत.