For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्र्यांची कोंडी : राज्यपालांकडे आणखी एक तक्रार

06:11 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्र्यांची कोंडी   राज्यपालांकडे आणखी एक तक्रार
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात राज्यालांकडे आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हैसूरमधील सामाजिक कार्यकर्ते स्नेहमयी कृष्ण यांनी दाखल केलेली तक्रार राज्यपालांच्या कार्यालयाने स्वीकारली आहे. राज्यपालांच्या नावे बेकायदेशीरपणे त्यागपत्र नोंदणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाचे प्रथम श्रेणी साहाय्यक के. सी. उमेश यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांच्याकडून त्यागपत्र नोंदणी करून घेतले आहे.

केसरे गावातील सर्व्हे नं. 464 मधील 3.16 एकर जमिनीशी संबंधित  त्यागपत्र नोंदणी करण्यात आले आहे. 25 नोव्हेंबर 2021 मध्ये बेकायदेशीरपणे तुमच्या नावाने त्यागपत्र नोंदणी झाली आहे. या बाबींचा विचार करता हे सरकारच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे उमेश व इतर अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, असा उल्लेख राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. सरकारच्या आदेशाविरुद्ध राज्यपालांच्या नावाने त्यागपत्र नोंदविण्यात आले आहे. म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाकडून तुमच्यावतीने नोंदविण्यात आलेली सर्व त्यागपत्रे त्वरित रद्द करण्याची सूचना राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना द्यावी, अशी विनंती तक्रारीत करण्यात आली आहे.

Advertisement

मुख्यमंत्र्यांच्यावतीने दाखल अंतरिम याचिका फेटाळली

म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या गैरव्यवहारासंबंधी स्नेहमयी कृष्ण यांनी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आलम पाशा यांनी खटल्याला परवानगी नसताना सिद्धरामय्यांविरुद्धची तक्रार स्वीकारू नये, अशी अंतरिम याचिका दाखल केली होती. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्यावतीने दाखल करण्यात आलेली ही याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली आहे.

Advertisement
Tags :

.