महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून चढाओढ

06:50 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शैलजा यांनी भजनलाल यांचा उल्लेख करत हुड्डाना केले लक्ष्य : काँग्रेसची अडचण वाढणार

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

हरियाणातील काँग्रेसच्या दलित नेत्या कुमारी शैलजा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर स्वत:चा दावा सांगितला आहे. भजनलाल यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवूनही काँग्रेस पक्षश्रेष्ठी भूपेंद्र सिंह हुड्डा यांना मुख्यमंत्री करू शकतात तर मग  यावेळी हु•ा यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविल्यावरही अन्य कुणाला म्हणजेच मला मुख्यमंत्री का करू शकत नाहीत असे प्रश्नार्थक विधान शैलजा यांनी केले आहे.

काँग्रेस महासचिव आणि राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला यांनीही मुख्यमंत्रिपदासाठी स्वत:ची इच्छा व्यक्त केली आहे. शैलजा यांच्याकडून वारंवार दावा करण्यात येत असताना भूपेंद्र हुड्डा यांचे पुत्र खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्या समर्थकांनीही त्यांचे नाव चर्चेत आणले आहे. पूर्ण निवडणुकीत दीपेंद्र हुड्डा हे काँग्रेसचे स्टार प्रचारक राहिले आणि वादग्रस्त नसलेले आणि सर्वमान्य नेते ते ठरू शकतात असे त्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी दीपेंद्र यांचे नाव चर्चेत आल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मी अद्याप टायर्ड नाही आणि रिटायर्ड देखील झालो नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदावरील माझा दावा कायम असला तरीही अंतिम निर्णय काँग्रेस नेतृत्वच घेणार असल्याचे हुड्डा यांनी म्हटले आहे.

जनतेने भाजपचे सर्व दरवाजे बंद केले आहेत. यावेळी राज्यात काँग्रेस विजयी होणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पक्षनेतृत्व घेणार असल्याचे शैलजा यांनी वक्तव्य केले आहे.

दुसरीकडे काँग्रेससोबत भाजपमध्ये देखील मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदार आहेत. भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनाच राज्यात नेतृत्व दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तर काही दिवसांपूर्वी माजी गृहमंत्री अनिल विज यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार घोषित करत भाजपच्या गोटामध्ये खळबळ उडवून दिली होती.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article