‘जादूगार’ चा दावा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला
पणजी : सरकारी खात्यांमध्ये अनेक पदे रिक्त असली तरी नोकरभरती प्रक्रिया कर्मचारी निवड आयोगामार्फतच करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारी नोकरभरती विषयावरून मोठी चर्चा रंगली आहे. खुद्द आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘जादूगार’ म्हणून संबोधलेव निवडणुकीपूर्वी ते 22 हजार पदे भरतील, असे जाहीर वक्तव्य केले. मात्र मुख्यमंत्र्यांनी सदर दावा फेटाळून लावला. या प्रक्रियेत ‘जादू’ करण्यासारखी कोणतीही भूमिका नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले व राणे यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केले. ‘आम्ही यापूर्वीच आयोगामार्फत 2500 पदे भरली आहेत. ही प्रक्रिया यापुढेही चालूच राहणार असून त्यासाठी मंत्र्यांनीही स्वत:च्या खात्यांचे प्रस्ताव आयोगाकडे सादर करावे, असे आवाहन त्यांनी केले.