डॉ.किरण ठाकुर यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
12:54 PM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : देशातील वृत्तपत्रे आणि नियतकालिक प्रकाशकांची सर्वोच्च संस्था असलेल्या ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ (आयएनएस) वर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. डॉ. किरण ठाकुर यांची ‘आयएनएस’वर सदस्यपदी निवड झाल्याचे समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या ‘एक्स’ हँडलवरून ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. किरण ठाकुर यांना मुद्रित माध्यमाबरोबरच त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठीही ओळखले जाते. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. तसेच ‘आयएनएस’वर सदस्य म्हणून त्यांनी आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करावा यासाठी शुभेच्छा देतो, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे म्हटले आहे.
Advertisement
Advertisement