For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अजित पवार यांच्या पार्थिवावर मुख्यमंत्र्यांनी वाहिले पुष्पचक्र

12:52 PM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
अजित पवार यांच्या पार्थिवावर मुख्यमंत्र्यांनी वाहिले पुष्पचक्र
Advertisement

पणजी : विमान अपघातात निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बारामती (महाराष्ट्र) येथे हजेरी लावून त्यांना पुष्पचक्र वाहिले व श्रद्धांजली अर्पण केली. तसेच पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्रासह देशातील राजकारणाची मोठी हानी झाली आहे. त्यांचे समाजकारणातील योगदान टिकून व स्मरणात राहील. अंत्यविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.