महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा यशस्वी करावा; कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रदीप नरके यांचे आवाहन

04:51 PM Feb 15, 2024 IST | Abhijeet Khandekar
Chandradip Narake
Advertisement

वाकरे प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी कोल्हापुरात येत असून त्यांचे करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांना जोरदार स्वागत करून त्यांचा दौरा यशस्वी करावा असे आवाहन कुंभी कासारी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.  अमृतसिद्धी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शाहुवाडी, राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी आमदार नरके बोलत होते अध्यक्षस्थानी कुंभी चे माजी संचालक आबा रामा पाटील होते.

Advertisement

माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या दोन वर्षात अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्याची सांगून या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे सांगितले. शिंदे शिवसेनेची ही धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा विधानसभेवर फडकवावा असे आवाहन त्यांनी केले.मुख्यमंत्री शिंदे हे तळागाळातील जनतेचे प्रतिनिधी असून त्यांच्या पाठीशी उभा राहणे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक व कुंभी कासारी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वास पाटील,गोकुळचे संचालक एस. आर.पाटील, अजित पाटील परितेकर ,राजू दिवसे, दौलू संतु पाटील,गगनबावडा माजी सभापती बंकट थोडगे यांच्यासह कुंभी कासारी कारखाना, कुंभी कासारी बँक, यशवंत सहकारी बँकेचे संचालक सहकारी संस्थांचे ,पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते .

Advertisement
Tags :
Chief Minister Eknath ShindeMLA Chandradeep Narke
Next Article