मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर
कोल्हापूर :
देशातील पहिला ऐतिहासिक ‘पन्हाळ्याचा रणसंग्राम’ लघुपट 13 डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिवप्रेमींसमोर येणार आहे. यासाठी किल्ले पन्हाळ गडावर 13 डी थिएटर उभारण्यात आले आहे. या थिएटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज 6 मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.
फडणवीस यांचे सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होईल. येथून ते मोटारीने विन्स हॉस्पिटल, बावडा रोड, महावीर कॉलेज जवळ, नागाळा पार्ककडे रवाना होतील. साडेपाच वाजता विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. पावणेसहा वाजता ते मोटारीने श्री क्षेत्र पैजारवाडीकडे (ता. पन्हाळा) प्रयाण करतील. सायंकाळी 6.30 वाजता शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरूजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरूजी यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण समारंभास ते उपस्थित राहतील. येथून पावणे सात वाजता ते पन्हाळगडाकडे मार्गस्थ होतील. सायंकाळी सात वाजता पन्हाळगडचा रणसंग्राम हा लघुपट व 13 डी थिएटरचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होईल. रात्री नऊ वाजता पन्हाळगडावरून ते कोल्हापूर विमानतळाकडे जातील.