मित्राच्या आदेशाविना मुख्यमंत्री नेमणूक खोळंबली होती
नाना पटोले यांचा महायुतीला टोला
मुंबई
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय जोपर्यंत ‘मित्र’ घेत नाही तोपर्यंत सरकार व मुख्यमंत्री होणार नाही. अडीच वर्षात निम्मी मुंबई व महाराष्ट्र मित्राला विकला असून यापुढेही महाराष्ट्र विकण्याचे काम हे सरकार करेल, त्यामुळे ‘मित्राचा’ आदेश येताच मुख्यमंत्री व सरकार बनेल टोला काँग्रेसच्या नाना पटोले यांनी अदानी यांचे नाव न घेता महायुतीला लगावला. राज्याचे मुख्यमंत्री होण्यास उशिर होत असल्याच्या चर्चा राज्यात सुऊ असताना पत्रकारांनी पटोले यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना महायुतीवर टिका केली. ते टिळक भवनात बोलत होते.
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास नसून काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत असल्याचे पटोले म्हणाले. यावेळी एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुऊ करणार आहे. हे अर्ज राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश व निवडणूक आयोग यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.