महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्री सुवर्ण पदके जाहीर

10:45 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सात पोलीस अधिकारी, दोन होमगार्डसह तीन अग्निशामक दल अधिकारी

Advertisement

पणजी : गोवा मुक्तिदिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणारी मुख्यमंत्री सुवर्ण पदके जाहीर झाली आहेत. सात पोलिस, दोन होमगार्ड आणि तीन अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना ही पदके जाहीर झाली आहेत. येत्या गोवा मुक्तीदिनी म्हणजे 19 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ही पदके प्रदान करण्यात येतील. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, मडगाव कोकण रेल्वेचे पोलिस उपअधीक्षक गुऊदास कदम, केपे उपविभागीय उपअधीक्षक नीलेश राणे, कळंगूटचे निरीक्षक परेश नाईक, ओल्ड गोव्याचे सहाय्यक उपनिरीक्षक नीळकंठ एकावडे, कोलवा वाहतूक विभागाचे सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र फळदेसाई, पणजीचे हवालदार नितीन गावकर यांना ही पदके जाहीर झाली आहेत. होमगार्ड ज्ञानेश्वर तुळस्कर आणि सिंथिया रॉड्रिग्ज यांना ‘मुख्यमंत्री गृहरक्षक पदक’ जाहीर झाले आहे. अग्निशामक दलातील उपअधिकारी शिवराम नाईक, लिडिंग फायर फायटर विष्णू गावस, फायर फायटर नितेश पागी या तीन अधिकाऱ्यांना ‘मुख्यमंत्री पदक’ जाहीर झाले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article