महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्री वैद्यकीयचे प्रमुख मंगेश चिवटे आज कोल्हापूर दौऱ्यावर

07:55 PM Dec 16, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील यांच्या आईच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या रविवारी (दि. 17) भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभागाचे प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम होणार असल्याची माहिती विश्वास पाटील यांनी दिली. श्रीमती जनाबाई नारायण पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी विश्वास नारायण पाटील फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम नियोजित केला जातो. 500 हून अधिक बॉटल रक्तसंकलन होते. शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील विद्यालयात सकाळी आठ वाजता होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही विश्वास पाटील यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Next Article