For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Cockroach Janta Party झुरळ जनता पार्टी नेमकी कशी अस्तित्वात आली?

03:36 PM May 21, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
cockroach janta party झुरळ जनता पार्टी नेमकी कशी अस्तित्वात आली
Advertisement

बेरोजगार तरुण हे झुरळासारखे असतात ज्यांना कुठेही रोजगार, नोकरी मिळत नाही असे तरुण मग मिडिया, सोशल मिडीया आणि आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करतात असं विधान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्यावेळी केलं आणि देशभरातील तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली, सोशल मिडीयावर कित्येकांनी सरन्यायाधिशांच्या या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Advertisement

सरन्यायाधीशांचे वक्तव्य

न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर, जी नाराजी तरुणांमध्ये निर्माण झाली त्याचा परिणाम या पक्षाच्या निर्मितीत झाला. समोर आलेल्या माहितीनुसार इंटरनेटवर कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक वेबसाइट तयार करण्यात आली असून, इन्स्टाग्रामवर या पार्टीचे ४० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि असे सांगितले जात आहे की, दोन लाखांहून अधिक लोकांनी वेबसाइटवर सदस्यत्वासाठी स्वतःची नोंदणी केली आहे. म्हणजेच सध्या कॉक्रोच जनता पार्टीला २ लाख तरुणांचे समर्थन मिळाले आहे.

Advertisement

 कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक कोण?
झुरळ जनता पक्षाच्या वेबसाइटवर त्याचे संस्थापक आणि संयोजक म्हणून अभिजीत दीपक यांचे नाव नमूद आहे. झुरळ जनता पक्षाच्या वेबसाइटवर त्याचे संस्थापक आणि संयोजक म्हणून अभिजीत दीपक यांचे नाव नमूद आहे.
आपली भूमीका आणि उद्देश स्पष्ट करताना अभिजीत केदार यांनी असं म्हटले की "मी ट्विटरवर (आता X) सरन्यायाधीशांचे (भारताचे सरन्यायाधीश) एक विधान पाहत होतो, ज्यात त्यांनी व्यवस्थेवर टीका केल्याबद्दल आणि मते व्यक्त केल्याबद्दल देशातील तरुणांची तुलना झुरळांशी आणि परजीवींशी केली होती."

बीबीसीच्या वृत्तानुसार दीपक म्हणतात "मला हे अत्यंत हास्यास्पद वाटले, कारण सरन्यायाधीश हे देशाच्या संविधानाचे संरक्षक मानले जातात, ज्या संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. आता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती तरुणांची तुलना झुरळे आणि परजीवींशी कशी करू शकते?
यामुळे माझ्या मनात राग आणि निराशा दाटून आली, आणि मी ट्विटरवर यावर माझे मत व्यक्त केले. मी विचारले की, जर सर्व झुरळे एकत्र आली तर काय होईल. मला 'जनरेशन झेड' आणि २५ वर्षांपर्यंतच्या तरुणांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला, ज्यात त्यांनी म्हटले की आपण एकत्र येऊन एक व्यासपीठ तयार केले पाहिजे. यावरून मला कल्पना सुचली की आपण 'झुरळ जनता पार्टी' नावाची एक सार्कास्टिक ऑनलाइन पार्टी तयार करावी.

झुरळ जनता पार्टी

तुम्ही आम्हाला झुरळं म्हणत असाल, तर ठीक आहे, आम्ही 'झुरळ जनता पार्टी' तयार करू. आपल्या या कल्पनेबद्दल बोलताना अभिजीत दिपक म्हणाले की मी या पक्षात सामील होण्यासाठी पात्रतेचे निकष ठरवले आहेत,

जसे की सरन्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आळशी असायला हवं, तुम्ही बेरोजगार असायला हवं आणि सरन्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सतत ऑनलाइन असायला हवं.
सरन्यायाधीशांनी तरुणांचा अपमान करण्यासाठी जे काही शब्द वापरले, त्यांतील तरुणांना आम्ही या पक्षाचे सदस्य बनण्यास पात्र ठरवले आहे.

काही तासांतच लाखो फॉलोअर्स

काही तासांतच याचा आश्चर्यकारक परिणाम दिसून आला आणि प्रत्येकजण त्याला प्रतिसाद देऊन स्वतःची नोंदणी करू लागला.
यानंतर आम्हाला जाणवू लागले की ही केवळ एक चेष्टा नसून काहीतरी मोठे घडणार आहे, कारण लोक निराश होत होते आणि आम्ही एक वेबसाइट तयार करून पक्षाचा जाहीरनामा बनवला. इन्स्टाग्रामवर आमचे वीस लाख फॉलोअर्स आहेत (आता चाळीस लाखांपेक्षा जास्त) आणि दोन लाखांहून अधिक लोकांनी कॉकरोच जनता पक्षाचे सदस्य म्हणून स्वतःची नोंदणी केली आहे. भारतीय राजकारणात बऱ्याच काळानंतर असे अभूतपूर्व घडत आहे.

अभिजीत दीपक कोण आहे?
कोणत्याही राजकीय पक्षासाठी किंवा चळवळीसाठी नेता आवश्यक असतो.

अभिजीत दीपक कोण आहेत?
कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपक हे छत्रपती संभाजी नगरचे आहेत. पुण्यात पदवीचा अभ्यास करत असताना त्यांनी काही काळ मला आम आदमी पार्टीच्या कम्युनिकेशन टीममध्ये काम केलं आहे .अभिजीत यांनी सांगितल्याप्रमाणे आम आदमी पार्टीच्या आरोग्य आणि शिक्षणावरील कार्यामुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झालो. भारतीय राजकारणात ही एक नवीन गोष्ट पहिल्यांदाच घडत होती. जसा आज झुरळासारखा जनता पक्ष नवीन आहे,

अभ्यासाची गरज वाटली

तसाच ते काहीतरी नवीन बदल घडवून आणणार आहेत, असे मला वाटले. मी त्यांच्यासोबत काही काळ काम केले, त्यानंतर मला अधिक अभ्यास करण्याची गरज वाटली आणि मी घरीच माझ्या मास्टर्सची तयारी सुरू केली. मला बोस्टन विद्यापीठाकडून आमंत्रण आले. मी तिथे दोन वर्षे राहून माझी पदवी पूर्ण केली. झुरळ जनता पक्षाचा जाहीरनामा सध्या तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे.

जाहीरनामा लोकशाहीची गरज

अभिजीत म्हणतात, "मला वाटते की हा जाहीरनामा भारतीय लोकशाहीची सद्यस्थिती आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. जे न्यायाधीश तटस्थ असायला हवेत आणि ज्यांचा सरकारशी काहीही संबंध असता कामा नये, तेच न्यायाधीश सेवानिवृत्तीनंतर सरकारकडून लाभ घेताना आपण बघतो हे चित्र खूप धोकादायक बाब आहे, कारण न्यायपालिका स्वतंत्र राहिली पाहिजे.

महिलांचे आरक्षण

जर न्यायपालिकासुद्धा सरकारचेच अनुकरण करू लागली, तर काय उरेल? मग लोकशाहीला कोण वाचवणार?"
महिलांच्या प्रतिनिधीत्वाविषयी बोलताना दिपक म्हणतात की . लहानपणापासून मी ऐकत आले आहे की महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळेल, पण आजपर्यंत तसे झालेले नाही. जर तुम्हाला महिलांना आरक्षण द्यायचे असेल, तर त्यांना ५० टक्के आरक्षण द्या.

अभिजीत अमेरिकेतून परतणार?

अभिजीत सध्या अमेरिकेत असून नुकतेच त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.... ते भारतात परतु शकतात. नेपाळच्या जेनजी तरुणाईने केलेली क्रांतीबद्दल अभिजीत यांचं मत थोडं वेगळं आहे ते म्हणतात की नेपाळच्या तरुणाईने हिंसाचाराने सत्तापरिवर्तन केल. भारतातले तरुण तसे नाहीत ते उपरोधिकपणे सोशल मिडीयावर व्यक्त होतील, झुरळाचा कॉस्च्युम घालून नद्या स्वच्छ करतील कारण त्यांना तो मार्ग योग्य वाटतो.

सध्या जरी अभिजीत अमेरिकेत असले तरी भारतात परतल्यानंतर ते आपल्या पार्टीचं काम पुढे चालवू शकतात. कारण घोषणेपासून चारच दिवसात या पक्षाने २ लाख सदस्यांची नोंदणी केली आहे. आणि ही गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही. आता पाहूया येणाऱ्या काळात या पक्षाचा राजकिय अजेंडा काय असणार आहे ते?

Advertisement
Tags :

.