For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजहंसगड येथे कुक्कुटपालन शेड पडल्याने कोंबड्या-पिल्ले मृत्युमुखी

06:18 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजहंसगड येथे कुक्कुटपालन शेड  पडल्याने कोंबड्या पिल्ले मृत्युमुखी
Advertisement

वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे मोठे नुकसान

Advertisement

वार्ताहर/ धामणे

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे राजहंसगड येथील गंगाधर पवार यांच्या शेतात असलेल्या पवार अॅग्रोफार्मचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये जवळपास साडेचार लाख रुपयाची हानी झाली आहे.

Advertisement

शुक्रवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामध्ये शेडचे सर्व पत्रे उडून गेले. तसेच लहान कोंबडीची पिल्ले व कोंबड्या मृत होऊन जवळपास साडेचार लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. यामुळे गंगाधर पवार यांचे फार मोठे नुकसान झाले असून, शासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.