For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छोत्रानी, अनाहत विजयी

01:53 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
छोत्रानी  अनाहत विजयी
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

वॉशिंग्टनमध्ये सुरू असलेल्या फायर खुल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या वीर छोत्रानीने बॅप्टिस्ट मासोटीचा पाच गेम्समधील लढतीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र भारताच्या वेलावन सेंथीलकुमारला मेक्सीकोच्या कार्डेनसकडून पराभव पत्करावा लागला. या लढतीत भारताच्या वीर छोत्रानीने फ्रान्सच्या चौथ्या मानांकीत स्पर्धकाचा 11-6, 7-11, 8-11, 11-1, 11-9 अशा गेम्समध्ये पराभव केला. आता छोत्रानीचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना इंग्लंडच्या डिक्लान जेम्सबरोबर होईल. मेक्सीकोच्या कार्डेनासने भारताच्या वेलावन सेंथीलकुमारचा पराभव केला.

महिलांच्या विभागात भारताच्या सातव्या मानांकीत अनाहत सिंगने द. आफ्रिकेच्या हेली वॉर्डचा 11-5, 11-8, 12-14, 11-5 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. अनाहत सिंगचा पुढील फेरीतील सामना इजिप्तच्या सना इब्राहीमशी होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.