'छावा' ची २०० कोटींच्या क्लबमध्ये भरारी
विकी कौशल अभिनीत छावा सध्या बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने २०२५ चे हिंदी चित्रपटांमध्ये दमदार ओपनिंग मिळवले आहे. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपट हा छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाने यंदा प्रदर्षित झालेल्या अनेक चित्रपटांच्या संपूर्ण कमाईपेक्षा जास्त ओपनिंग घेतलेले आहे. सिनेमात विकी कौशल, रश्मिका मंधानासह अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा अशी तगडी स्टारकास्टही आहे.
विकी कौशलचा छावा हा चित्रपट प्रचंड कमाई करत आहे. चित्रपटाने पहिल्या सोमवारी मोठई करून दाखविली आहे. चित्रपटाने पहाटेपासून शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. यासिनेमाने मल्टीप्लेक्सच नाहीत, तर अनेक शहरांमधील सिंगल स्क्रीन थिएटरनापण गर्दी ओढून आणलेली आहेत.
सिनेमा प्रदर्शित होऊन चार दिवस झाले तरी कमाई जोरदार सुरू आहे. छावा सिनेमाचे प्रमोशनही जोरदार करण्यात आले होते. तर बॉक्स ऑफीसवर गर्दी खेचून आणण्यासाठी माऊथ पब्लिसिटीच महत्त्वाची ठरली आहे. या सिनेमाबद्दल अनेक प्रेक्षकांनी त्यांच्या सोशल मिडीयावर भरभरून लिहीलेले आहे. अनेक बाल मावळे सुद्धा हा सिनेमा पाहून येताना पाणावलेल्या डोळ्याने बाहेर येत आहेत.
या चित्रपटाने पहिल्या सोमवारी २४ कोटी रुपये कमावले असून या वर्षी प्रदर्शनाच्या पहिल्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. चित्रपटाचे पहिल्यादिवशीचे ओपनिंग ३१ कोटीचे असून रविवारी ४८.५ कोटींची कमाई या सिनेमाने केली आहे, ही माहिती सॅकनिकच्या अहवालानुसार आहे.
तसेच जगभरात या चित्रपटाने सुमारे १७० कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्या चार दिवसात चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता या चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये सहज प्रवेश करेल अशी चर्चा होत आहे.