'छावा' ची बॉक्स ऑफीसवर धमाकेदार बाजी
मुंबई
'विकी कौशल'च्या 'छावा' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर धमाकेदार बाजी मारली आहे. 'लक्ष्मण उत्तेकर' दिग्दर्शित 'छावा' सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३० कोटीहुन अधिक बिझनेस केला आहे. हा चित्रपट हिंदीसह अनेक भाषेत एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे.
२०२५ मधला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत छावा हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमातील औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना याने साकारली आहे. सिनेमाला सर्व स्थरातून चांगला प्रतिसाद येत आहे. तसेच समीक्षकांनीही चित्रपटाला, कथानकाला उचलून धरत सकारात्मक प्रतिसाद नोंदविला आहे.
या सिनेमा विकी कौशल च्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. विकी कौशल, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, प्रदीप रावत, डायना पॅंटी, संतोष जुवेकर, विनीत सिंह, दिव्या दत्ता असे एकसेएक तगडे कलाकार या सिनेमातून पहायला मिळतील. छावा चित्रपटाच कथानक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुरू होतं. औरंगजेबाला मुघलांसमोर आता कोणाच आव्हान राहील नाही असं वाटत असतानाच संभाजी महाराजांनी लूट केल्याची बातमी येते आणि तिथून औरंजेबाचा अहंकार गळून पडतो. इथूनच या दमदार कथानकाची सुरुवात होते. या सिनेमात रश्मिका मंदाना हीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची म्हणजे येसुबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे.