'छावा' चित्रपट प्रदर्शनावेळी कोल्हापुरात मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके
04:41 PM Feb 14, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूमीत अनोखे स्वागत
चिमुरड्यांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके कोली सादर
कोल्हापूर
शुक्रवारी राज्यभर प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत बहुचर्चित 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे कोल्हापुरात ही विशेष पद्धतीने स्वागत करण्यात आले. हलगीच्या तालावर, पारंपरिक वेशात, चिमुरड्यांनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले.
प्रेक्षकांच्या मोठ्या प्रतिसादात छावा चित्रपटाला दिमाखदरपणे सुरुवात झाली आहे. राज्यात या चित्रपटाचे जोरदार स्वागत केले जात असून प्रेक्षकही भरभरून प्रतिसाद देत आहेत. कोल्हापुरात मर्दानी खेळाने केलेले चित्रपटाचे स्वागत चर्चेचा विषय बनले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement