For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगड : तीन दिवसात सात नक्षलवाद्यांचा खात्मा

06:51 AM Jun 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगड   तीन दिवसात सात नक्षलवाद्यांचा खात्मा
Advertisement

2 महिलांसह 5 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ विजापूर

छत्तीसगडच्या विजापूर जिह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 5 ते 7 जून दरम्यान झालेल्या चकमकीत सैनिकांनी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये केंद्रीय समिती सदस्य गौतम उर्फ सुधाकर आणि तेलंगणा समिती सदस्य भास्कर यांचा समावेश आहे. सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि स्वयंचलित शस्त्रs जप्त करण्यात आली आहेत. मारल्या गेलेल्या सुधाकरवर 40 लाख आणि भास्करवर 45 लाखांचे बक्षीस होते.

Advertisement

5 जून रोजी झालेल्या पहिल्या चकमकीनंतर सुधाकरचा मृतदेह सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने दंडकारण्य प्रदेशात नक्षल प्रशिक्षण केंद्रे सुरू केली होती. 6 जून रोजी तेलंगणा राज्य समितीशी संबंधित नक्षलवादी कमांडर भास्कर मारला गेला. त्यानंतर 6 आणि 7 जूनच्या मध्यरात्री झालेल्या चकमकीत आणखी 3 नक्षलवादी मृतदेह सापडले असून त्यात 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. 7 जून रोजी झालेल्या शेवटच्या चकमकीत आणखी 2 पुरुष नक्षलवादी मृतदेह सापडले. अन्य पाच मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांची माहिती गोळा केली जात आहे. चकमकीच्या ठिकाणाहून 2 एके-47 रायफल, मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि नक्षलवादी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. नक्षलींशी झालेल्या चकमकीवेळी काही सैनिकांना साप आणि मधमाश्यांनी चावा घेतला होता. सध्या सर्वजण धोक्याबाहेर आहेत. सर्वांवर उपचार सुरू असल्याचे सुरक्षा सूत्रांकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.