महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

छत्तीसगड, मध्यप्रदेश मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

06:55 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विष्णूदेव साय आणि मोहन यादव यांनी सूत्रे स्वीकारली, मंत्रीमंडळ विस्तार लवकरच

Advertisement

► वृत्तसंस्था/ रायपूर, भोपाळ

Advertisement

छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी शपथग्रहण केले आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये सरकारांची स्थापना झाली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा आणि पक्षाचे इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. तसेच प्रचंड जनसमुदायही उपस्थित होता.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांचा शपथविधी राजधानी रायपूर येथील विज्ञान महाविद्यालयाच्या पटांगणात झाला. त्यांना राज्यपाल विश्वभुवन हरिचंदन यांनी  पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. साय हे वनवासी समाजातील नेते आहेत. गेल्या रविवारी त्यांची भाजपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली होती. साय हे छत्तीसगडच्या रायगड मतदारसंघातून 1999 ते 2024 या कालखंडात चार वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांना राज्याच्या कुंकुरी मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. साय यांच्यासह अरुण साव आणि विजय शर्मा यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांची निवड उपमुख्यमंत्री म्हणून करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.

मोठा जनसमुदाय उपस्थित

छत्तीसगड येथील कार्यक्रमाला 50 हजारांहून अधिकचा जनसमुदाय उपस्थित होता, अशी माहिती छत्तीसगड प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव हे उपस्थित होते. बघेल यांनी कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन केले. हा चर्चेचा विषय बनला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री भाजप नेते रमणसिंग उपस्थित होते.

भोपाळ येथेही कार्यक्रम

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा शपथविधी पार पडला आहे. त्यांच्यासह जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री म्हणून करण्यात आली आहे. गेल्या सोमवारी त्यांची निवड मध्यप्रदेश भाजप विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमुखाने करण्यात आली होती. यादव आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहानही उपस्थित होते. त्यांनीही कार्यक्रमानंतर जनतेचे आभार मानले. आता मी आपला निरोप घेत आहे, असे विधान त्यांनी केले. हा शपथविधी कार्यक्रम मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील मोतीलाल नेहरु पटांगणात पार पडला. या कार्यक्रमालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा आणि इतर मान्यवर नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य सिंदिया आणि इतर भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.

उच्च शिक्षण आणि खड्गकौशल्य

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे अतिउच्चशिक्षित आहे. त्यांनी विज्ञान शाखेत बीएससी, एलएलबी, दोन एमएच्या पदव्या, एमबीए आणि दोन पीएचडी उपाधी इतके शिक्षण घेतले आहे. तसेच ते उत्कृष्ट खड्गपटू (तलवारकुशल) म्हणून प्रसिद्ध आहेत, ही माहिती त्यांच्यासंबंधी देण्यात आली आहे.

सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथम निर्णय

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपक प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा त्यांचा मुख्यमंत्री या नात्याने प्रथम निर्णय आहे. आपण सर्वांना आपल्या समवेत घेऊन वाटचाल करणार आहोत. तसेच सुशासन सुनिश्चित करणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी शपथग्रहण केल्यानंतर उपस्थित जनसमुदायासमोर केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article