For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात छत्रपती शिवरायांचा जयघोष

10:16 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात छत्रपती शिवरायांचा जयघोष
Advertisement

गावोगावी शिवजयंती उत्साहात साजरी : अभिषेक, पोवाड्यासह इतर विविध कार्यक्रम : घोषणांनी अवघा तालुका दुमदुमला

Advertisement

वार्ताहर /किणये

तालुक्यात गुऊवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. गावोगावी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पूजा अर्चा करण्यात आली. शिवजयंती सोहळ्यानिमित्त महिला व धारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. काही गावांमध्ये पोवाडा व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, अशा घोषणांनी गुऊवारी अवघा तालुका दुमदुमला होता. तालुक्मयाच्या बहुतांशी गावांमध्ये गावच्या वेशीवर, गावच्या मध्यभागी, चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारली आहे. या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. तसेच रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गुऊवारी पहाटेपासूनच शिवजयंती सोहळ्याला सुऊवात करण्यात आली. धारकरी व कार्यकर्ते ध्येयमंत्र व प्रेरणा मंत्र म्हणताना दिसत होते. काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

किणये गावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा, शिवस्मारक कार्यकारी मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुऊवारी सकाळी शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. गावातील गणेश मंदिराजवळ 2 मे 2022 रोजी 12 फूट उंच अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्यात आली आहे. तेव्हापासून रोज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन कार्यकर्ते करीत असतात. गुऊवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन विजय डुकरे यांच्या हस्ते करण्यात आले. महेश पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. प्रारंभी गणेश पूजन संतोष पाटील यांनी केले. ध्वज पूजन महादेव डुकरे, शिवमुद्रा पूजन पुंडलिक दळवी यांनी केले. त्यानंतर महाआरती झाली. गावातील मुलींनी पाळणा गीत म्हटले. यावेळी निवृत्ती डुकरे, माऊती डुकरे, शिवाजी उंदरे, देवेंद्र डुकरे, अरविंद कीर्तने, अनिल होसूरकर, सुशांत पाटील आदींसह गावातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मच्छे जय भवानी युवक मंडळ

मच्छे गावातील जय भवानी युवक मंडळ पाटील गल्ली व लक्ष्मी गल्ली येथील नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. दोन्ही गल्लीतील महिलांनी पाळणागीत म्हटले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित बऱ्याच जणांची भाषणे झाली.

सावगाव येथील शिवस्मारक सेवा समिती

सावगाव येथील शिवस्मारक सेवा समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा सावगाव व शिवप्रेमी नागरिकांतर्फे गुऊवारी शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. तालुक्मयाच्या पश्चिम भागातील सावगावमध्ये सुंदर अशी छत्रपती शिवरायांची मूर्ती उभारण्यात आली आहे.

आकर्षक फुलांची सजावट

सिंहासनावर आऊढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे रोज पहाटे पूजन करण्यात येते. शिवजयंती सोहळ्यानिमित्त शिवस्मारकाला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती, प्रेरणा मंत्र म्हणण्यात आले. गावातील मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा म्हटला. सायंकाळी या ठिकाणी गावातील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.

बहाद्दरवाडी ब्रह्मलिंग मंदिर

बहाद्दरवाडी गावातील ब्रह्मलिंग मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, महाआरती व पाळणागीत म्हटले. त्यानंतर सर्वांना तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले. बेळगुंदी, येळेबैल राकसकोप, बिजगर्णी, बेळवट्टी, कावळेवाडी, नावगे, बाळगमट्टी, रणकुंडये, वाघवडे आदी गावांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Advertisement
Tags :

.