For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत उद्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

सावंतवाडीत उद्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघस्तरीय 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अभियानाचे आयोजन शुक्रवार, ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात करण्यात आले आहे.

Advertisement

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार प्रमोद जठार, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव तसेच जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विविध शासकीय योजना, सेवा आणि उपक्रमांची माहिती व लाभ या शिबिरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Advertisement

तरी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी वीरसिंग वसावे आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.