For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवरायांच्या जयघोषाने छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुमला

03:09 PM Jun 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
शिवरायांच्या जयघोषाने छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुमला
Advertisement

शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन साजरा :
धार्मिक विधीनंतर पालखी सोहळा
► प्रतिनिधी
कोल्हापूर
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुऊवारी शिवराज्याभिषेकदिन सोहळा तिथीनुसार साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी क्षणाक्षणाला ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देऊन चौक परिसर दणाणून सोडला. शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याच्या धार्मिक विधींची सांगता झाल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे शहर कार्यवाह आशिष लोखंडे यांनी तिथीनुसार सर्वत्रच साजरा झालेल्या या सोहळ्याने 351 व्या शिवशकाला आरंभ झाल्याचे सांगितले.
दरम्यान, सोहळा साजरा करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व मावळे भगवे फेटे बांधून शिवाजी चौकात जमले. त्यांनी सुऊवातीला संपूर्ण चौकाची साफसफाई केली. त्यानंतर शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याच्या धार्मिक विधींना आरंभ केला. चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक कऊन 11 नद्यांच्या पाण्याने अभिषेक केला. पुष्पहार अर्पण कऊन छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष केला. अंध व्यक्तींसह विविध जातींमधील सात दांपत्यांच्या हस्ते शिवरायांच्या लहान पुतळ्याला दुग्धाभिषेक व विविध प्रकारच्या फळांपासून तयार केलेला रसाचा अभिषेक केला. जलाभिषेक कऊन पुष्पहार अर्पण केला. शिवाजी महाराजांची आरतीसुद्धा केली. बिंदू चौकातील शाहू वैदिक स्कूलचे पुजारी सहदेव गुरव यांनी वेदमंत्राने पौराहित्य केले. याचवेळी प्रेरणामंत्र म्हणून साखर-पेढ्यांचे वाटप केले.
सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर पालखी सोहळ्याला आंरभ केला. शिवरायांचा लहान पुतळा फुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान केला. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक झाल्यानंतर रायगडावरील देवदेवतांचे दर्शन घेतले होते. त्याच पार्श्वभूमीवर हलगी आणि शिवरायांच्या जीवनावरील पोवाडे आणि गीतांच्या ठेक्यावर पालखी सोहळा साजरा केला. शिवाजी चौकातून सुऊ झालेल्या या सोहळ्यांतर्गत तुळजाभवानी मंदिर, अंबाबाई मंदिर दक्षिण दरवाजा, महालक्ष्मी बँक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, पुन्हा महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका आदी मार्गावऊन पालखीची नगर प्रदक्षिणा पूर्ण कऊन पालखी पुन्हा शिवाजी चौकात आली.
अडीच तास सुऊ राहिलेल्या या सोहळ्यामध्ये पालखी मार्गातील तुळजा भवानी माता, गणपती, करवीर निवासिनी अंबाबाई, ग्रामदैवत कपिलेश्वर, शनीदेव आदी देवदेवतांचे दर्शन घेतले. पालखी सोहळ्याची सांगता करण्यापूर्वी शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ ध्येयमंत्र म्हटले. सोहळ्याचा प्रसाद म्हणून दोनशेहून अधिक जणांना केळ व चिवड्यांचे वाटप केले. सोहळा नेटकेपणा साजरा करण्यासाठी रोहित अतिग्रे, सागर कडतारे, अवधूत चौगुले, सुमेध पोवार, संदीप गुरव, संग्रामसिंह निकम, अनिऊद्ध कोल्हापूरे, दीपक देसाई, गजानन तोडकर यांच्यासह सुजाता अतिग्रे, निशिगंधा पाटील यांनी विशेष परीश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.