For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवरायांमुळे गोव्याचे संपूर्ण धर्मांतरण टळले

12:58 PM Feb 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
शिवरायांमुळे गोव्याचे संपूर्ण धर्मांतरण टळले
Advertisement

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे उद्गार : राज्यस्तरीय शिवजयंती उत्साहात साजरी

Advertisement

फोंडा : परकीय सत्तेविऊद्ध कडवी झुंज देताना, देशवासीयांमध्ये स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वराज्याची प्रेरणा जागविणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते. अखंड भारतवर्षाचे पहिले स्वप्न पाहणाऱ्या शिवरायांमुळेच संपूर्ण गोव्याचे धर्मांतर करण्याच्या पोर्तुगीज मनसुब्याना चाप बसली. पोर्तुगीजांच्या साडेचारशे वर्षांच्या राजवटीत गोव्याचा बहुतेक भाग शिवशाहीच्या छत्राखाली सुरक्षित राहिल्याने येथील मंदिरे, धर्म आणि संस्कृती टिकली. शिवरायांचे गोव्यासाठी हे महत्त्वाचे योगदान असून हा इतिहास नवीन पिढीसमोर अभ्यासाला येणे आवश्यक आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

राज्यस्तरीय शिवजयंती उत्सव काल बुधवार 19 रोजी फर्मागुडी किल्ल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी किल्ल्यावरील अश्वाऊढ छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कऊन अभिवादन केले. माहिती व प्रसिद्ध खात्यातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, फोंड्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक, बांदोडाचे सरपंच रामचंद्र नाईक, प्रियोळच्या सरपंच दिशा सतरकर, माहिती खात्याचे सचिव रमेश वर्मा, संचालक दीपक बांदेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

शिवरायांमुळेच संपूर्ण धर्मांतर टळले

शिवकालीन गोव्याचा इतिहास हे एक स्वतंत्र पर्व आहे. पोर्तुगीज व युरोपियन वसाहतवाद्यांची समुद्रावरील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शिवरायांनी देशातील पहिले आरमार उभारले. पोर्तुगीज राजवटीला वचक बसविण्यासाठी त्यांनी गोव्यावर ज्या स्वाऱ्या केल्या त्यामागे आर्थिक वर्चस्व हा उद्देश नव्हता. जोरजबदस्तीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराला पायबंद घालणे व राजकीय हेतू त्यामागे होता. गोव्यावर पोर्तुगीजांची राजवट साडेचारशे वर्षे होती, यात पुरेसे तथ्य नाही. केवळ सासष्टी, बार्देश व तिसवाडी हे तीनच तालुके पोर्तुगीजांच्या अंमलाखाली होते. फोंडा, डिचोली व पेडणेसह उर्वरीत गोवा अडीचशे वर्षे हिंदवी स्वराज्यामध्ये राहिल्याने धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या सुरक्षित राहिला. शिवाजी महाराजांनी पहिली स्वारी बार्देश तालुक्यावर कऊन येथील धर्मांतरावर निर्बंध घालण्यासाठी पोर्तुगीजांना धाक दाखवून तसा तह केला. ब्रिटिश व युरोपिय विस्तारवाद्यांना पायबंद घालणारे शिवराय हे पहिले भारतीय राजे होते. शिवकालीन गोमंतकाचा इतिहास सांगणारे पोर्तुगीज व भारतीय इतिहासकारांनी लिहिलेले अनेक दस्तवेज आज उपलब्ध आहेत. बेतुल किल्ला, काब दी राम हे जलदुर्ग या इतिहासाचे साक्ष देतात. शिव छत्रपती आणि धर्मवीर संभाजी राजांनी गोव्यासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे गोव्याच्या प्रत्येक तालुक्यात शिवजयंती साजरी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. शिवराय हे गोव्याचा स्वाभिमान व अभिमान असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी शेवटी केला.

शिवराय देशाला लाभलेले खंबीर नेतृत्त्व

मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, भारतवर्षांत समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, सम्राट अशोक असे महान व आदर्श राज्यकर्ते होऊन गेले. पण आधुनिक इतिहासात शिवाजी महाराज हे देशाला लाभलेले खंबीर दूरदृष्टीचे नेतृत्त्व होते. त्यांच्या एकंदरीत जीवनाचे विविध पैलू स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. राजकीय नेत्यांसाठी शासनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी शिवाजी महाराजांची राजनीती अनुकरणीय आहे. शिवरायांचे हे गुण आचरणात आणल्यास शिवजयंती साजरी करण्याचे सार्थक होईल.

येसूबाईंचा इतिहासही जागापुढे यावा

मंत्री गोविंद गावडे यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटाचा संदर्भ देत महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्त्वाचा आलेख आपल्या भाषणातून मांडला. संभाजी राजांना औरंगजेबाने केलेली कैद व त्यांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी येसूबाईनी दिलेली कडवी झुंज यातून त्यांचा करारीपणा व मुत्सद्देगिरी दिसते. अशा कर्तृत्त्ववान स्त्रीयांचा झाकलेला इतिहास विविध माध्यमातून जगापुढे येण्याची गरज आहे. प्रतिजीजाऊ म्हणून त्यांचा आदर्श प्रेरणादायी असून कठिण परिस्थितीत लढण्याची प्रेरणा देणारा आहे, असे गावडे म्हणाले.

जगदंब ढोलताशा पथकातर्फे दमदार वादन व शिवरायांच्या जयघोषाने कार्यक्रमाची सुऊवात झाली. विद्यार्थ्यांचे लेझिम पथक व पारंपरिक पद्धतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. छत्रपतींना अभिवादन केल्यानंतर किल्ल्याच्या प्रवेश द्वारात बालभवनच्या बालकलाकारांनी सुरेख असा पोवाडा गाऊन अफझलखान वधाचा प्रसंग सादर केला. त्यानंतर स्व. भाऊसाहेब बांदोडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कऊन येथील गोपाळ गणपती मंदिरच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मुख्य कार्यक्रम झाला. दीपक बांदेकर यांनी स्वागत केले. गिरीश वेळगेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर संयुक्त संचालक गणेश बर्वे यांनी आभार मानले. मुख्य कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारीत अखिल गोवा पातळीवर आंतर महाविद्यालयीन प्रश्न मंजुषा स्पर्धा तसेच हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी नाट्याप्रवेश स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी चौरंग नागेशी या संस्थेतर्फे ‘शिवसंभव’ हा नाट्याप्रयोग सादर करण्यात आला.

Advertisement
Tags :

.