For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवप्रतिष्ठानतर्फे छ. संभाजी महाराज राज्याभिषेक दिन

11:22 AM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
शिवप्रतिष्ठानतर्फे छ  संभाजी महाराज राज्याभिषेक दिन
Advertisement

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हिंदू तिथीनुसार माघ शु. सप्तमी, रथसप्तमीनिमित्त धर्मवीर छ. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संभाजी महाराज चौक येथे साजरा करण्यात आला. कुंभमेळा, प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या जलाने अभिषेक, दुग्धाभिषेक घालण्यात आला. प्रारंभी प्रेरणामंत्र झाले. जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पूजन झाले. प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी 7 ते 11 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या गडकोट मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी विभागप्रमुख चंद्रकांत चौगुले, अमोल केसरकर, विजय कुंटे, गजानन निलजकर, रामकृष्ण सुतार, अजित बांदेकर, संतोष कुसाने, प्रवीण घागवे यासह धारकरी, शिवभक्त उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.