For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ-छगन भुजबळ

10:47 AM Sep 14, 2023 IST | Abhijeet Khandekar
इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ छगन भुजबळ
Advertisement
Chhagan Bhujbal News : दहा ग्रॅम इलेक्ट्रॉनिक वजन काटा अचूकते बाबतच्या निर्णया स्थगिती देण्याबाबत दूध संस्था संघटनांचे प्रतिनिधी दूध उत्पादक शेतकरी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांचे एकत्रित बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
दहा ग्रॅम अचुकतेच्या वजन काटा वापराच्या निर्णयात स्थगिती देण्यासंदर्भातील निवेदन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था संघटनेने मंत्री भुजबळ यांना दिले.याप्रसंगी झालेल्या बैठकीमध्ये यासंदर्भात चर्चेतून तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्री भुजबळ यांनी दिले.यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील म्हणाले, दूध संकलन केंद्रावर खरेदी-विक्री करता दहा ग्रॅम अचूकतेचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे वापरण्यासंबंधीचा निर्णय अव्यवहार्य आहे.दहा ग्रॅम इलेक्ट्रॉनिक वजन काटयाचा वापराने प्रत्यक्षातील कामकाज जिकिरीचे होणार आहे.सगळी प्रक्रिया वेळखाऊ तसेच शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहे.दुधाची प्रत व गुणवत्तेवर परिणाम संभावतो.तेव्हा राज्य सरकारने दहा ग्रॅम अचूकतेच्या संदर्भातील पाटील त्रुटी दूर कराव्यात.
सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतीही वजन काटा १० ग्रॅम वजनाच्या अचुकतेसाठी वापरण्यास योग्य नाही.दूध द्रव्य पदार्थ असल्यामुळे १० ग्रॅमसाठी वजन काटा स्थिर राहू शकत नाही व त्यामध्ये फरक येऊ शकतो.वजन काटा स्थिर न राहिलेस उत्पादक व संस्था यांच्यामध्ये वजनाविषयी गैरसमज निर्माण होऊन वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.दूध संकलनास विलंब होईल संस्थेचे दूध संकलन वेळेत पूर्ण होणार नाही.त्यामुळे दूध खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे उत्पादकांचे आर्थिक नुकसान होईल. सध्या वापरात असणाऱ्या वजन काट्यावरती १ लिटर ५१ मिली दुधाचे वजन झालेस  प्रत्यक्षात १ लिटर १०० मिली दाखवते. तसेच १ लिटर ४९ मिली दुधाचे वजन झालेस प्रत्यक्षात १ लिटर वजन दाखवले जाते.त्यामुळे संस्थेचा किंवा उत्पादकांचे कोणतेही प्रकारचे नुकसान होत नाही.
Advertisement

शासन परिपत्रकानुसार दूध संस्थांच्याकडे सध्या वापरात असणारी सर्व वजन काटे स्लॅप करून राज्यामध्ये जितक्या दूध संस्था कार्यरत आहेत त्या संस्थांना नवीन वजन काटे खरेदी करावे लागतील व त्याचा आर्थिक भुर्दंड संस्थांना बसेल पर्यायाने त्याची आर्थिक झळ दूध उत्पादकांना सोसावी लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.यावर मंत्री भुजबळ यांनी यासंदर्भात संघटनेचे प्रतिनिधी, दुध उत्पादक शेतकरी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन  सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

यावेळी वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ.सुरेश मेकला,विलास पवार,कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, पदाधिकारी शामराव पाटील, विश्वास पाटील,संजय पाणारी आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Tags :

.