शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ चेतन नरके यांनी धामोड खोऱ्यात भेटीगाठी
कोल्हापूर
इंडिया आणि महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी धामोड खोऱ्यात गावा गावात भेटीगाठी घेऊन महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले.
चेतन नरके यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा दिला आहे. गुरुवारी मरळी, मल्हारपेठ, सावर्डे, मोरेवाडी, नवलेवाडी, वाघुर्डे, सुळे, गोगवे, कोदवडे, खामनेवाडी, वेतवडे, मुसलमानवाडी, पणोरे, वाळपवाडी, निवाचीवाडी, हरपवडे, अंबर्डे, पनोत्रे, आकुर्डे गावात त्यांनी महाराजांचा जोरदार प्रचार केला. गावागावात जात तेथील प्रमुख नेते, सहकारी संस्थाचे प्रतिनिधी, गावक्रयांची भेट घेऊन प्रचार केला.
प्रचार बैठकात चेतन नरके म्हणाले, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी गेले दोन वर्षे तयारी करत होतो. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. पण मला उमेदवारी मिळाली नाही. तरी संविधान वाचवण्यासाठी मी निवडणूकीतून माघार घेत शाहू छत्रपतींना पाठिंबा दिला आहे. निवडणूकीपूर्वी मी कोल्हापूरचे व्हिजन केले होते. मी तयार केलेल्या व्हिजनला शाहू छत्रपतींनी पाठिंबा दिला आहे. कोल्हापूरच्या विकासाचे माझे स्वप्न साकार करण्यासाठी शाहू महाराज यांना विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या या प्रचारयात्रेला गावागावात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दौऱ्यामध्ये दिनकर पाटील, सुहास पाटील, संजय मोरे, दत्ता महाराज, बोगरे यांची भेट घेउन महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे आवाहन नरके यांनी केले.