कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जीसीएवर चेतन-बाळू पॅनेल विजयी

12:30 PM Sep 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माजी रणजीपटू महेश देसाई जीसीएचे ‘बॉस’ : अनंत नाईकांना सर्वाधिक क्लबांची पसंती  

Advertisement

मडगाव : संपूर्ण गोव्याच्या क्रीडा वर्तुळात लक्ष राहून गेलेली आणि राज्यातील सर्वांत श्रीमंत अशी क्रीडा संस्था असलेल्या गोवा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत चेतन देसाई-बाळू फडके यांचे पॅनेल पूर्ण बहुमताने निवडून आले. ‘पॅनेल ऑफ प्रोग्रेस अँड युनिटी’चे सर्वच्या सर्व सहाही उमेदवार निवडून आले. हे नवीन कार्यकारी मंडळ 2025-28 या कालावधीपर्यंत कार्यरत असेल. अकबर मुल्ला आणि सूरज लोटलीकर यांचा पाठिंबा लाभलेल्या चेतन बाळू पॅनेलने बीसीसीआयचे संयुक्त सचिव रोहन गावस देसाईच्या परिवर्तन पॅनेलचा 6-0 असा पराभव केला. ‘पॅनेल ऑफ प्रोग्रेस अँड युनिटी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि चेतन देसाईंचे बंधू महेश देसाई, उपाध्यक्षपदी परेश फडते, मानद सचिवपदी तुळशिदास शेट्यो, संयुक्त सचिवपदी अनंत नाईक, खजिनदारपदी सय्यद अब्दुल माजीद तर सदस्यपदी महेश बेकी हे निवडून आले.

Advertisement

रोहन गावस देसाई यांच्या परिवर्तन पॅनेलचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. मागील जीसीएच्या व्यवस्थापकीय मंडळात असलेले राजेश पाटणेकर, दया पागी आणि रुपेश नाईक हे पराभूत झाले.   माजी रणजीपटू महेश देसाईने परिवर्तन पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार महेश कांदोळकरचा 62 विरूद्ध 45, उपाध्यक्षपदासाठी परेश फडतेने माजी सभापती राजेश पाटणेकरचा 63-43, सचिवपदासाठी झालेल्या लढतीत तुळशिदास शेट्योने दया पागीचा 59-43, संयुक्त सचिवपदासाठी झालेल्या एकतर्फी लढतीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे खजिनदार अनंत नाईकने सुशांत नाईकचा 70-36, खजिनदारपदासाठी सय्यद अब्दुल माजिदने रुपेश नाईकचा 58-48 तर सदस्यपदासाठी महेश बेकीने मेघनाथ शिरोडकरचा 65-41 मतांनी पराभव केला.

सर्वांत जास्त मते अनंत नाईकांना 

निवडणुकीत सर्वांत मोठा विजय फोंड्यातील अनंत शंभू नाईकने मिळविला. त्यांनी संयुक्त सचिवपदासाठी झालेल्या लढतीत परिवर्तन पॅनेलच्या सुशांत नाईकचा तब्बल 34 मतांनी पराभव केला. अनंत यांना 70 मते तर सुशांतला केवळ 36 मते मिळाली.

सर्वांत कमी मते हेमंत आंगलेला

या निवडणुकीत सर्वांत कमी मते सचिवपदासाठी उमेदवार असलेल्या हेमंत आंगलेला मिळाली. आंगलेला केवळ 3 मते प्राप्त झाली. या निवडणुकीत गोवा क्रिकेट संघटनेच्या संलग्नीत 107 क्लबांनी मतदान केले. काल सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता ए. के. जोती यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरूवात झाली.

राज्यातील क्रिकेट बळकट करू : महेश देसाई

क्लबांच्या विश्वासाच्या बळावर आमच्या पॅनेलला विजय मिळाला. आम्ही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे जीसीएचे नवीन ‘बॉस’ माजी रणजीपटू महेश देसाई म्हणाले. सर्व 107 क्लब आमचे आहेत. विरोध हा फक्त निवडणुकीपुरताच असतो. सर्व क्लबांना घेऊन आपण पुढे जाणार आहे. आमच्या पॅनेलमधील सर्वजण निवडून आल्याने आता आंतरराष्ट्रीय स्टेडियमची निर्मिती करणे सोपे जाईल असे सांगून शासनासह इतर पक्षांचा पाठिंबाही आम्ही त्यासाठी मिळवू असे ते म्हणाले. राज्यातील क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलणार आहोत. सर्व क्लबांच्या सहकार्याने येत्या तीन वर्षांत विकासात्मक कामे करण्यासाठी आमचा भर राहिल असे महेश देसाई म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article