For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेर्नोबिलचा सुपरक्रीडा धोकादायक

06:42 AM Dec 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेर्नोबिलचा  सुपरक्रीडा धोकादायक
Advertisement

रेडिएशनही ठरले निष्प्रभ

Advertisement

चेर्नोबिल हे जगातील सर्वात धोकादायक किरणोत्सर्गी भाग, तेथे माणूस वास्तव्य करू शकत नाही, हजारो प्राणी किरणोत्सर्गामुळे मृत्युमुखी पडले, त्यांना कॅन्सरसारखे धोकादायक आजार झाले. तेथे केवळ दोन गोष्टी शिल्लक राहिल्या, जे रेडिएशननंतर स्वत:ला बदलू शकले, यात काही श्वान देखील सामील आहेत.

याचबरोबर एका खास जीवावर या धोकादायक किरणोत्सर्गाचा  कुठलाही प्रभाव पडला नाही. आता या शोधामुळे वैज्ञानिक चकित झाले आहेत. चेर्नेबिल एक्सक्लूजन झोनमध्ये काही मायक्रोस्कोपिक कीडे मिळाले आहेत. त्यांना नीमेटोड्स म्हटले जते, त्यांच्या शरीरावर किरणोत्सर्गाचा कुठलाही परिणाम झालेला नाही. जर हे नैसर्गिक तंत्रज्ञान माणसाने स्वीकारले तर त्याच्यावरही किरणोत्सर्गाचा प्रभाव पडणार नाही. आता वैज्ञानिक याचविषयी अध्ययन करत आहेत.

Advertisement

वैज्ञानिकांनी ज्या नीमेटोड्सना चेर्नोबिलच्या आसपासच्या क्षेत्रात जमा केले होते, त्यांच्या शरीरावर किरणोत्सर्गाचा कुठलाच प्रभाव दिसून आलेला नाही. हे पाहून वैज्ञानिक चकित झाले आहेत, प्रत्यक्षात हे पूर्णपणे अशक्यासारखे प्रकरण होते. अध्ययनात वैज्ञानिकांनी सीईझेड अन्य जीवांसाठी सुरक्षित नाही, परंतु हे कीडे पूर्णपणे योग्यस्थितीत असल्याचे नमूद केले आहे.

या नीमेटोड्सनी चेर्नोबिलच्या पर्यावरणाला वरचढ ठरू दिले नाही. आम्ही या नीमेटोड्चे अध्ययन करून त्यांचे डीएनए रिपेयर मॅकेनिजम समजू शकतो. यामुळे भविष्यात किरणोत्सर्गाचे शिकार आणि कॅन्सर रुग्णांसाठी औषध निर्माण करता येणार असल्याचे न्यूयॉर्क युनिवर्सिटीच्या बायोलॉजिस्ट सोफिया तिनतोरी यांनी सांगितले आहे.

एप्रिल 1986 मध्ये झालेल्या आण्विक स्फोटानंतर चेर्नोबिलनजीक प्रिप्याट हा भाग रिकामी आहे. तेथे जाण्यासाठी शासनाची अनुमती घ्यावी लागते. तेथे विस्फोटानंतर फैलावलेल्या किरणोत्सर्गाच्या प्रभावत वृक्ष, रोप, प्राणी सर्व सापडले होते, यामुळे त्यांच्यात म्युटेशन, कॅन्सर आणि मृत्यू यासारख्या घटना दिसून आल्या होत्या.

2600 चौकिमीचा भाग

या भागाला माणसांच्या वास्तव्याच्या दृष्टीने योग्य होण्यासाठी हजारो वर्षे लागणार आहेत. परंतु प्राणी अशा कुठल्याही भागापासून दूर जाण्याचे बंधन जाणत नाहीत. विस्फोटानंतर सीईझेडचा 2600 चौरस किलोमीटरचा भाग प्राण्यांसाठी अभयारण्यच ठरला आहे. या भागात राहणाऱ्या जीवांवर किरणोत्सर्गाचा वेगवेगळा प्रभाव दिसून येत आहे.

चेर्नोबिल दुर्घटनेची तुलना होऊ शकत नाही. याचा स्थानिक लोकसंख्येवर विशेष प्रभाव पडला आहे. तेथील किरणोत्सर्गी निसर्गाने स्वत:च्यासोबत राहणाऱ्या जीवांना सक्षम केले आहे. एकप्रकारे या वातावरणात राहण्यायोग्य करण्यास भाग पाडले आहे. यामुळे काही श्वानांचे जीन्स म्युटेट झाले आहेत.

नीमेटोड्सवर नाही प्रभाव

या नीमेटोड्सवर या किरणोत्सर्गाचा प्रभाव पडलेला नाही. हे राउंडवर्म्स असतात,  हे वेगवेगळया प्रकारच्या अधिवासात राहतात. जीवांच्या शरीरातही त्यांचे वास्तव्य असते. हजारो वर्षांपर्यंत पर्माफ्रॉस्टमध्ये म्हणजेच बर्फात गाडल्यावरही ते परत जिवंत होतात असे तज्ञांचे सांगणे आहे. सोफिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चेर्नोबिलनजीक ओसियस टीप्युले प्रजातीचा नीमेटोड्स मिळाला. हे मातीत राहतात, सोफिया यांनी सडलेली फळे, पाने आणि मातीतून शेकडो कीड्यांचे नमुने जमा केले. त्यांच्यारव गीगर काउंटर्सद्वारे रेडिएशनची तपासणी केली. तेथे जमा करण्यात आलेल्या 300 कीड्यांच्या 15 स्पेसिमेनची जीनोम सिक्वेसिंग करण्यात आले. त्याची तुलना फिलिपाईन्स, जर्मनी, अमेरिका, मॉरिशन आणि ऑस्ट्रेलियाच्या कीड्यांच्या जीनोम सीक्वेंससोबत करण्यात आली. हे सर्व एकसारखेच होते. म्हणजेच रेडिएशनचा कुठलाच प्रभाव पडला नव्हता.

Advertisement
Tags :

.