For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नईचा मुकाबला आज गुजरातशी

06:50 AM Apr 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
चेन्नईचा मुकाबला आज गुजरातशी
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

चेन्नई : पुनरागमनाच्या मार्गावर असलेला चेन्नई सुपर किंग्स संघ आज रविवारी गुजरातशी भिडणार असून यावेळी ते गुणतालिकेतील आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतील, तर गुजरात टायटन्स संघ आपली घसरण थांबवण्याचा प्रयत्न करेल. संथ सुऊवातीनंतर सीएसकेने पुनरागमन करत आपल्या शेवटच्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत, ज्यात मुंबई इंडियन्सवर मिळवलेल्या 103 धावांच्या मोठ्या विजयाचा समावेश आहे. हा विजय संजू सॅमसनच्या या हंगामातील दुसऱ्या शतकाच्या जोरावर मिळवला गेला.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील सीएसके संघ सहा गुणांसह अव्वल चार संघांच्या अगदी बाहेर आहे आणि प्लेऑफमधील स्थानासाठी प्रयत्न करत असताना पुढील घसरण टाळण्यास उत्सुक असेल. सध्या तरी सीएसकेसाठी परिस्थिती सुधारत आहे. सॅमसनच्या फलंदाजीतील चमकदार कामगिरीला अकील होसेनच्या नेतृत्वाखालील अचूक गोलंदाजीची जोड मिळाल्याने मुंबईवर त्यांना दणदणीत विजय मिळवता आला.

Advertisement

विशेष म्हणजे त्यांनी हा पराक्रम संघाचा आधारस्तंभ एम. एस. धोनी (पायाच्या पोटरीची दुखापत) आणि स्थानिक खेळाडू आयुष म्हात्रे (धोंडशिरेची दुखापत) यांच्याशिवाय केला आहे. तथापि काही चिंता कायम आहेत. जरी आघाडीच्या फळीने सातत्यपूर्ण कामगिरी केली असली, तरी मधल्या फळीला आक्रमक खेळ दाखवण्यात आणि भागीदारी रचण्यात संघर्ष करावा लागला आहे. सनरायझर्स हैदराबादविऊद्ध सीएसकेने आठ गडी हातात असताना 90 चेंडूंमध्ये 130 धावांचे लक्ष्य ाहज गाठायला हवे होते, परंतु मधल्या फळीच्या खराब कामगिरीमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

राजस्थान रॉयल्सच्या रियान परागप्रमाणेच गायकवाड स्वत: खराब फॉर्ममधून जात आहे, तर सर्फराज खान, शिवम दुबे आणि देवाल्ड ब्रेविस यासारखे खेळाडू मिळालेल्या चांगल्या सुऊवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र, गोलंदाजी विभाग ही एक मोठी सकारात्मक बाब आहे.

गुजरात टायटन्ससाठी ही संधी गमावण्याचीच कहाणी ठरली आहे. दमदार सुऊवातीनंतर त्यांनी आपले मागील दोन सामने गमावले आहेत. सीएसकेसोबत ते सहा गुणांवर असले, तरी खराब नेट रन रेटमुळे (-0.790) गुजरात संघ सातव्या स्थानावर आहे. ज्या स्वरुपात आक्रमकतेला अधिकाधिक महत्त्व दिले जाते, तिथे त्यांचा सावध पवित्रा नेहमीच यशस्वी ठरलेला नाही. विशेषत: मधल्या फळीने निराशाजनक कामगिरी केली आहे आणि अनेकदा मिळालेल्या चांगल्या सुऊवातीचा फायदा उठवण्यात ते अपयशी ठरले आहेत.

संघ : गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहऊख खान, अनुज रावत, जोस बटलर, कुमार कुशाग्र, टॉम बँटन, ग्लेन फिलिप्स, जेसन होल्डर, निशांत सिंधू, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, साई किशोर, जयंत यादव, अर्शद खान, मानव सुतार, रशिद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा.

चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, संजू सॅमसन, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, सर्फराज खान, उर्विल पटेल, अमन खान, शिवम दुबे, झॅक फॉक्स, रामकृष्ण घोष, अंशुल कंबोज, जेमी ओव्हरटन, मॅथ्यू शॉर्ट, प्रशांत वीर, राहुल चहर, श्रेयस गोपाल, गुरजपनीत सिंग, मॅट हेन्री, अकील होसेन, स्पेन्सर जॉन्सन, मुकेश चौधरी, नूर अहमद.

सामन्याची वेळ : दुपारी 3:30 वा.

Advertisement
Tags :

.