For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नई सुपर किंग्जचा आज सनरायझर्स हैदराबादशी मुकाबला

06:05 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेन्नई सुपर किंग्जचा आज सनरायझर्स हैदराबादशी मुकाबला
Advertisement

वृत्तसंस्था /हैदराबाद

Advertisement

फॉर्मात असलेला गोलंदाज मुस्तफझूर रेहमानशिवाय चेन्नई सुपर किंग्जला आज शुक्रवारी येथे आयपीएलमध्ये अंदाज न बांधता येणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागणार असून यावेळी सीएसकेला सर्व विभागांतील आपला खेळ सुधारावा लागेल. सातत्य हे सीएसकेचे वैशिष्ट्या असून दिल्ली कॅपिटल्सविऊद्धच्या हंगामातील पहिल्या पराभवानंतर संघाची गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा विचार संघ व्यवस्थापन करेल. विशाखापट्टणममधील सामन्यानंतर सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नमूद केल्याप्रमाणे ही एक लांबलचक स्पर्धा आहे आणि कामगिरीत घसरण अपेक्षित आहे. गायकवाड आणि त्याचा सलामीचा जोडीदार रचिन रवींद्र यांना स्वींगचा सामना करण्याच्या दृष्टीने आज तयार राहावे लागेल. एम. एस. धोनीने आठव्या क्रमांकापेक्षा आधी येऊन फलंदाजी करावी अशी सर्वांची इच्छा असून या मोसमातील पहिल्याच डावात त्याने 16 चेंडूंत 37 धावा केल्यानंतर. ही इच्छा आणखी वाढली आहे. तथापि, असे घडण्याची शक्यता नाही कारण धोनीला शिवम दुबे आणि समीर रिझवी यासारख्यांनी आधी येऊन काम पूर्ण करावे असे वाटते. अमेरिका आणि कॅरिबियन प्रांतात होणाऱ्या ‘टी-20’ विश्वचषकात सहभागी होण्याच्या दृष्टीने व्हिसावर प्रक्रिया करण्यासाठी मुस्तफिझूर बांगलादेशमध्ये परतलेला असल्याने गोलंदाजीच्या समीकरणांवर सीएसकेला विचार करावा लागेल.

मुस्तफिझूर आणि मथीशा पाथिराना या परदेशी जोडीने सीएसकेसाठी चांगली कामगिरी केलेली आहे. मुस्तफिझूरच्या जागी ते मुकेश चौधरीची निवड करू शकतात. शार्दुल ठाकूरलाही अद्याप एकही सामना मिळालेला नाही. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद घरच्या मैदानाच्या अनुकूलतेचा फायदा उठवू पाहतील. मुंबई इंडियन्सविऊद्ध येथे केलेल्या विक्रमामुळे त्यांच्या फलंदाजांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असेल. मात्र सलामीवीर मयंक अग्रवालवरचा दबाव वाढत आहे. तो अद्याप प्रभाव पाडू शकलेला नाही. गुजरात टायटन्सविऊद्ध सनरायझर्सची फलंदाजी स्पर्धेत प्रथमच अपयशी ठरली. गोलंदाजीच्या आघाडीवरही जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे आणि भुवनेश्वर कुमार हे महागडे ठरले आहेत. अनुभवी भुवनेश्वरची खास करून नवीन चेंडूवरील कामगिरी निराशाजनक आहे. कर्णधार पॅट कमिन्सने मात्र तीन सामन्यांत चार बळी घेताना प्रति षटक 8 या सरासरीने धावा दिल्या आहेत. शुक्रवारी रात्री त्याला इतरांच्या पाठिंब्याची गरज भासेल.

Advertisement

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार),जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फाऊकी,  वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रे•ाr, मार्को जेनसेन, अभिषेक शर्मा, उपेंद्र यादव, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेन्रिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा, उमरान मलिक.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शेख रशिद, मोईन अली, शिवम दुबे, आर. एस. हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिझूर रेहमान, पाथीराना, सिमरजित सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकूर, महीश थीक्षाना, समीर रिझवी.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ सिनेमा अॅप

Advertisement
Tags :

.