For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नई सुपर किंग्स ‘घरी’ पण हरले

06:58 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
चेन्नई सुपर किंग्स ‘घरी’ पण हरले
Advertisement

 चेपॉकवर पंजाबचा 5 विकेट्सनी दणदणीत विजय : श्रेयस अय्यरची फिफ्टी,

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सकडून चेन्नईला 6 गड्यांनी पराभवाचा सामना करावा लागला. सलग दोन विजयांसह पंजाबचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 5 बाद 209 धावा केल्या. यानंतर विजयासाठीचे 210 धावांचे टार्गेट पंजाबने सहज पार केले. विशेष म्हणजे, चेन्नईचे सर्व गोलंदाज निष्प्रभ ठरले आणि त्यांना सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला. 11 चेंडूत 39 धावा झोडपणाऱ्या प्रियांश आर्यला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

प्रारंभी, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनची जोडी मैदानावर आली. पण या जोडीला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. संजू सॅमसन अवघ्या 7 धावा करून माघारी परतला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रे या दोघांनी मिळून 96 धावांची भागीदारी केली. यादरम्यान गायकवाड 28 धावा करून माघारी परतला. तर आयुष म्हात्रेने 43 चेंडूत 73 धावांची खेळी केली. शिवम दुबेने 27 चेंडूत नाबाद 45 धावांची खेळी केली. शेवटी सर्फराज खानने 12 चेंडूत 32 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने 20 षटकांत 5 गडी बाद 209 धावा केल्या.

पंजाबचा दणकेबाज विजय

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या प्रियांश आर्यने अवघ्या 11 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या साहाय्याने 39 धावांची खेळी केली. तर प्रभसिमरन सिंगने 34 चेंडूंचा सामना करुन 6 चौकार आणि 1 षटकारांच्या साहाय्याने 43 धावांचे योगदान दिले. सर्फराज खानने त्याला धावबाद करून माघारी धाडले, यामुळे त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकले. गेल्या सामन्यातील विजयाचा हिरो ठरलेल्या कुपर कोनोलीला चांगली सुरूवात मिळाली होती. पण तो 22 चेंडूत 36 धावा करून माघारी परतला. दुसरीकडे, कर्णधार श्रेयस अय्यरनेही शानदार खेळी साकारताना 29 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारासह 50 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. शेवटी चेन्नईने लागोपाठ दोन विकेट्स घेत पंजाबवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण शशांक सिंगने 6 चेंडूत नाबाद 14 धावा करत संघाला 18.4 षटकांत विजय मिळवून दिला.

Advertisement
Tags :

.