For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नई-पंजाब किंग्स आज आमनेसामने

06:55 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
चेन्नई पंजाब किंग्स आज आमनेसामने
Advertisement

जोरदार पुनरागमनाचे ‘सीएसके’ला वेध, कूपर कोनोलीच्या समावेशाने ‘पंजाब किंग्स’चे पारडे भारी

Advertisement

वृत्तसंस्था  / चेन्नई :

आज शुक्रवारी येथे इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्याच घरच्या सामन्यात बलाढ्या पंजाब किंग्सला कडवी झुंज देण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला खेळाच्या सर्वच विभागांमध्ये लक्षणीय सुधारणा करावी लागेल. राजस्थान रॉयल्सविऊद्धच्या सलामीच्या सामन्यात सीएसकेची सुऊवात अत्यंत निराशाजनक झाली होती. युवा खेळाडूंनी भरलेल्या सीएसके संघाला गुवाहाटीमध्ये काहीच जमले नाही. आयपीएलसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या स्पर्धेत त्या मानहानिकारक पराभवाला मागे टाकून पुढे जाण्याची त्यांची आता इच्छा असेल.

Advertisement

अलीकडेच झालेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान चेन्नईच्या खेळपट्टीचे स्वरूप ज्या प्रकारे होते ते पाहता शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल राहील अशी अपेक्षा आहे. दुखापतग्रस्त असल्यामुळे एम. एस. धोनी गुवाहाटीला गेला नव्हता. परंतु आपल्या पायाच्या पोटरीच्या दुखापतीतून सावरत असतानाही कर्णधार ऋतुराज गायकवाडला मार्गदर्शन करण्यासाठी तो पुन्हा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या हंगामातील त्यांचा सर्वांत मोठा करार केलेला खेळाडू संजू सॅमसन सीएसकेकडून पदार्पण करताना फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यामुळे आता आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर मोठी छाप पाडण्यासाठी तो नक्कीच उत्सुक असेल.

रॉयल्सविऊद्धच्या सामन्यात सीएसकेला त्यांचा प्रमुख फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसच्या सेवा उपलब्ध नव्हत्या. तसेच त्याच्या बरगडीच्या दुखापतीतून तो किती सावरला आहे याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. फलंदाजीची घसरण सुरू झाल्यानंतर ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून सर्फराज खानला मैदानात उतरवण्यात आले होते. पण तो फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही. तरीही 2023 च्या हंगामापासूनच्या आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात तो मैदानात अत्यंत सहज आणि आत्मविश्वासाने खेळताना दिसला. स्पर्धा जसजशी पुढे सरकेल तसतशा कार्तिक शर्मासारख्या युवा खेळाडूंकडून संघाला अधिक चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा असतील.

गोलंदाजीच्या आघाडीवर बोलायचे झाल्यास वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज फलंदाजीसमोर मॅट हेन्री आणि नूर अहमदसारखे गोलंदाज अगदीच सामान्य भासले. त्या जोरदार तडाख्यानंतर पुन्हा जोमाने पुनरागमन करण्यासाठी हे गोलंदाज नक्कीच आतुर असतील. सीएसकेचा सामना गतवर्षीच्या अंतिम फेरीतील संघ असलेल्या पंजाब किंग्सशी होणार आहे. श्रेयस अय्यर आणि रिकी पाँटिंग यांच्या मार्गदर्शनाखालील हा संघ आता अत्यंत बलाढ्या संघ म्हणून उभा राहिला आहे. या हंगामात विजेतेपदापर्यंत मजल मारण्याचे उद्दिष्ट बाळगून असलेल्या या संघाला तिसऱ्या क्रमांकावर कूपर कोनोलीच्या रूपाने सक्षम फलंदाज गवसला आहे. मंगळवारी रात्री गुजरात टायटन्सविऊद्धच्या सामन्यात त्याने अत्यंत तणावपूर्ण अशा परिस्थितीत धावसंख्येचा पाठलाग करताना संघाचा डाव समर्थपणे सावरला.

गुजरातविऊद्धच्या सामन्यात जो पाठलाग तसे पाहता अत्यंत सोपा असायला हवा होता त्यामध्ये संघाची मधली फळी काहीशी डगमगली. या अनुभवामुळे आता फलंदाजीमध्ये अधिक प्रभावी कामगिरी करण्यासाठी हा संघ नक्कीच उत्सुक असेल. पुन्हा एकदा अत्यंत तंदुऊस्त क्रिकेटपटू म्हणून आयपीएलमध्ये परतलेल्या युजवेंद्र चहलने टायटन्सविऊद्ध आपल्या गोलंदाजीची अचूकता आणि गतीमधील वैविध्याने सर्वांना प्रभावित केले. त्याने डावाच्या मधल्या षटकांमध्ये धावांचा ओघ रोखला तसेच दोन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. संघाचा आणखी एक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू हरप्रीत ब्रार हा मात्र अंतिम 12 खेळाडूंच्या यादीचा भाग नव्हता. पंजाब किंग्सला त्याला अंतिम अकरामध्ये किंवा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून संघात स्थान देण्यासाठी काही तरी मार्ग शोधावा लागेल. विजयकुमार वैशाखने गेल्या हंगामात जिथे आपली कामगिरी थांबवली होती तिथूनच पुढे सुऊवात केली आहे. त्याने डावाच्या सर्वच टप्प्यांमध्ये पंजाब किंग्ससाठी मोलाची कामगिरी बजावली.

संघ : पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, हरनूर सिंग, मिचेल ओवन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, अझमतुल्ला उमरझाई, मार्को जॅनसेन, मार्कस स्टॉइनिस, अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्युसन, हरप्रीत ब्रार, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, कूपर कोनोली, बेन ड्वार्शियस, मुशिर खान, प्रवीण दुबे, विशाल निषाद, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग, पायला अविनाश, शशांक सिंग.

चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेवाल्ड ब्रेव्हिस, एम. एस. धोनी, उर्विल पटेल, संजू सॅमसन, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, जेमी ओव्हरटन, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, मुकेश चौधरी, नूर अहमद, अकील होसेन, प्रशांत वीर, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, मॅट हेन्री, राहुल चहर, झॅकरी फॉक्स, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक शर्मा, सर्फराज खान, आयुष म्हात्रे.

सामन्याची वेळ: सायंकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.