For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नईला आज राजस्थानविरुद्ध विजय अत्यावश्यक

06:53 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेन्नईला आज राजस्थानविरुद्ध विजय अत्यावश्यक
Advertisement

वृत्तसंस्था / चेन्नई

Advertisement

आयपीएलमधील प्ले-ऑफच्या शर्यतीत आपले स्थान पक्के करण्यासाठी विजयाची गरज असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ आज रविवारी येथे राजस्थानचा रॉयल्सचा सामना करणार आहे. जरी सीएसके आपल्या घरच्या स्टेडियमवर खेळणार असला, तरी मागील दोन पराभवांमुळे अस्वस्थ झालेल्या राजस्थान रॉयल्सला तोंड देणे हे त्यांच्यासाठी सोपे आव्हान ठरणार नाही.

सुपर किंग्ज सध्या 12 सामन्यांतून 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. परंतु शुक्रवारच्या गुजरात टायटन्सविऊद्धच्या पराभवामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला आहे आणि आता त्यांनी उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजय मिळविणे आवश्यक बनले आहे. दुसरीकडे, रॉयल्स 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सविऊद्धच्या सलग दोन पराभवांतून ते सावरत आहेत. त्यांना प्ले-ऑफमधील स्थान गमवावे लागण्याचा कोणताही धोका नाही, परंतु संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ लवकरात लवकर विजयी मार्गावर परतण्यास आणि बाद फेरीत प्रवेश करण्यास उत्सुक असेल.

Advertisement

गुजरातविरुद्ध अजिंक्य रहाणे, रचिन रवींद्र व कर्णधार ऋतुराज गायकवाड यांचा समावेश असलेल्या वरच्या फळीला चमक दाखविता न आल्याने सीएसके अडचणीत आली. ते चेपॉकवर पुन्हा सूर मिळविण्यास उत्सुक असतील. रवींद्रला आज रॉयल्सविऊद्ध आणखी एक संधी दिली जाऊ शकते. डॅरिल मिशेल आणि मोईन अली यांनी धावा केलेल्या असल्या, तरी शिवम दुबे टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात निवड झाल्यापासून फॉर्म हरवून बसला आहे. सीएसकेच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास तुषार देशपांडेने गुजरातविरुद्ध प्रभावी मारा केला, तर शार्दुल ठाकूरने फारशा धावा न देऊन सर्वांना चकीत केले. आज दुपारचा सामना असल्याने दवाचे प्रमाण कमी राहणार असून ते सीएसकेच्या फिरकीपटूंना फायदेशीर ठरू शकते.

संघ-चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, अरावेली अवनीश, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आर. एस. हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, सिमरजित सिंग, प्रशांत सोळंकी, शार्दुल ठाकूर, महीश थीक्षाना, समीर रिझवी.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, आवेश खान, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, केशव महाराज.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.

Advertisement

.