For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजयपथावर परतण्यास उत्सुक चेन्नई-हैदराबादमध्ये आज लढत

06:54 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
विजयपथावर परतण्यास उत्सुक चेन्नई हैदराबादमध्ये आज लढत
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला लागोपाठ दोन पराभव स्वीकारावे लागल्यानंतर आज रविवारी येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना करताना ते विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक राहतील. नवीन कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सीएसकेने मोसमाची चांगली सुऊवात केली होती, परंतु गेल्या दोन सामन्यांत त्यांना लखनौ सुपर जायंट्सने पराभूत केले आहे.

आठ सामन्यांतून चार विजय आणि चार पराभवांसह सीएसके सध्या पाचव्या स्थानावर आहे, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सप्रमाणे त्यांचे 8 गुण झाले आहेत आणि प्लेऑफची शर्यत गरम होत असताना ते विजयपथावर येण्यास उत्सुक असतील. दुसरीकडे, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादने या हंगामात दोनदा आयपीएलच्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला आहे. परंतु फलंदाजीतील अतिआक्रमक धोरणाचा त्यांना मागील सामन्यात फटका बसलेला आहे.

Advertisement

सीएसकेची फलंदाजी कर्णधार गायकवाड आणि फॉर्मात असलेला शिवम दुबे यांच्याभोवती फिरते. गायकवाडने आपल्या दुसऱ्या आयपीएल शतकाची नोंद नुकतीच केलेली आहे. रवींद्र जडेजानेही चांगली फलंदाजी केली आहे. पण वरच्या फळीतील रचिन रवींद्र आणि डॅरी मिशेल यांचा हरवलेला फॉर्म ही चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे त्यांना फलंदाजीची क्रमवारी बदलणे भाग पडले आहे. गोलंदाजीचा विचार करता यजमानांना मागील वेळी एलएसजीविऊद्ध कठोर परिश्रम करावे लागले होते. चेपॉक येथे अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणात दव पडल्यामुळे त्यांचे फिरकीपटूंना निप्रभ ठरले आणि पाहुण्यांनी 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याचा पुरेपूर फायदा घेतला.

दुसरीकडे, हवेत उडणारे हैदराबादचे विमान मागील सामन्यात आरसीबीने मैदानात आणलेले आहे. त्यांना गुऊवारी घरच्या मैदानावर 35 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हा त्यांचा आयपीएलमधील केवळ तिसरा पराभव आहे. तथापि, त्यामुळे ते विचलित होणार नाहीत. ‘आरसीबी’विरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची वरची आणि मधली फळी अपयशी ठरली. त्यामुळे दुसऱ्या डावात अतिआक्रमक धोरणे पत्करण्यावर संघ फेरविचार करू शकतो.

हैदराबादच्या फलंदाजीतील क्रमवारीत बदल होण्याची शक्यता नाही, परंतु एडन मार्करमला प्रभावी कामगिरी करून दाखवावी लागेल. गोलंदाजीत वरिष्ठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार मागील तीन सामन्यांमध्ये फक्त एक बळी मिळवू शकला आहे. उमरान मलिक, फझलहक फाऊकी आणि आकाश सिंग हे संधीची वाट पाहत असल्याने त्यांच्यापैकी एखाद्याला खेळविण्याचा विचार केला जाऊ शकतो.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.