महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुसळधार पावसामुळे चेन्नई शहर ठप्प

06:42 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अभिनेता रजनीकांतच्या आलिशान घरातही भरले पाणी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

चेन्नई आणि त्याच्या लगतच्या जिह्यांमध्ये मंगळवारपासून जोरदार पाऊस झाला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहराच्या बऱ्याच भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच अत्यावश्यक सेवाही विस्कळीत झाल्या. पुराचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. या पुरात स्थानिक नागरिक अडकल्याने त्यांना मदत पुरविताना प्रशासनाचीही तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

सोशल मीडियावर चेन्नईतील पुराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. याचदरम्यान सुपरस्टार रजनीकांत यांच्या शहरातील प्रसिद्ध ठिकाण पोस गार्डनमधील आलिशान व्हिलामध्येही पुराचे पाणी भरले होते. परिसरात पूरसदृश परिस्थिती दिसून येत आहे. रजनीकांत यांच्या निवासस्थानाभोवतीचे पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. नुकसान कमी करण्यासाठी त्यांचे कर्मचारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. रजनीकांत यांच्या घराभोवती पूर येण्याची ही पहिलीच वेळ नाही; 2023 मध्ये मिचॅन्ग चक्रीवादळामुळे अशीच घटना घडली होती.

विमान, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम

पाणी साचल्यामुळे दक्षिण रेल्वेने चेन्नई सेंट्रल-म्हैसूर कावेरी एक्स्प्रेससह चार एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकापूर्वी अनेक गाड्या वळवण्यात आल्या किंवा थांबवण्यात आल्या. तसेच विमानतळारील विविध समस्यांमुळे अनेक देशांतर्गत उ•ाणेही रद्द करण्यात आली.

मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत आणखी पावसाची शक्मयता वर्तवली आहे. तसेच चिन्हांकित कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास तिऊवल्लूर, कांचीपुरम, चेंगलपट्टू आणि चेन्नई जिह्यात एक किंवा दोन ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता आहे.

पुराचा सामना करण्यासाठी सरकारची सज्जता

तामिळनाडूने बाधित जिह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. आपत्ती प्रतिसाद पथके सज्ज ठेवली असून 219 नौका तयार आहेत. रहिवाशांना घरातच राहण्याचा आणि अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पावसाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी चेन्नई कॉर्पोरेशनने 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. लोकांच्या सुरक्षेची काळजी घेत पाणी तुंबलेल्या भागात वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

Advertisement
Next Article