For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानात चिनाबचा प्रवाह 92 टक्क्यांनी घटला

06:36 AM Jun 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानात चिनाबचा प्रवाह 92 टक्क्यांनी घटला
Advertisement

‘मृत साठ्या’पेक्षाही खालावणार नदीची पातळी : 40 टक्के पिकाचे नुकसान होण्याचा धोका

Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसाब्sातचा 65 वर्षे जुना सिंधू जल करार स्थगित केला होता. आता पाकिस्तानात याचा प्रभाव दिसून येत आहे. पाकिस्तानात चिनाब नदीचा प्रवाह 92 टक्क्यांपर्यंत घटला आहे. नदीत 29 मे रोजी जलप्रवाह 98 हजार 200 क्यूसेक इतका होता, आता हे प्रमाण केवळ 7200 क्यूसेक राहिले अहे. पाण्याची पातळी 3000 क्यूसेक म्हणजेच ‘मृत साठ्या’पेक्षाही खालावू शकते. पंजाब आणि सिंध प्रांतातील 6.5 कोटी शेतकरी सिंचनासाठी चिनाब नदीवर निर्भर आहेत.

Advertisement

पाण्याच्या कमतरतेमुळे तेथील 40 टक्क्यांपेक्षा अधिक पीक नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. सिंधूनदीवरील तारबेला धरण आणि झेलमवरील मंगला धरणातही पाणीसाठा अत्यंत कमी आहे. यामुळे पाकिस्तानचा यंदाचा खरीप हंगाम अलिकडच्या काळातील सर्वात खराब ठरणार असल्याचे तेथील कृषी मंत्रालयाचे मानणे आहे.

आतापर्यंत 2200 अब्ज रुपयांचे नुकसान

पाकिस्तान सरकार आणि सैन्याच्या विरोधात शेतकरी संघटनांमध्ये संताप आहे. पाकिस्तान किसान इत्तिहादने (पीकेआय) स्थिती न सुधारल्यास शेतकरी इस्लामाबाद कूच करतील असा इशारा दिला आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे केवळ गव्हाच्या पिकाचे 2200 अब्ज रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा दावा पीकेआयने केला आहे. हे प्रकरण पाकिस्तानच्या एकूण कृषी जीडीपीच्या 23.15 टक्के आहे. पाण्याची समस्या दूर न झाल्यास हे नुकसान वर्षाच्या अखेरपर्यंत 4500 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

धरणातील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी

पाकिस्तानातील महत्त्वपूर्ण धरणांची स्थिती अत्यंत खराब आहे. तारबेला आणि मंगला धरणात पाणीसाठा निम्म्यापेक्षाही कमी आहे. पाण्याचा पुरवठा अशाचप्रकारे कमी होत राहिल्यास शिल्लक 50 टक्के पाणीसाठाही संपुष्टात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

ग्रीन पाकिस्तान प्रकल्प कारणीभूत

ग्रीन पाकिस्तान प्रकल्पाच्या अंतर्गत बहावलपूर सारख्या वाळवंटी भागांना कालव्यांद्वारे जोडले जाणार आहे. परंतु या प्रकल्पामुळे पाकिस्तानच्या दक्षिण हिस्स्यांमध्ये पाणी घटणार असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. ग्रीन पाकिस्तान हे सरकारी षड्यंत्र असल्याचे सिंध येथील शेतकरी नेते मूसा अली यांचे सांगणे आहे. अनेक शेतकरी संघटनांनी या प्रकल्पाच्या विरोधात निदर्शनेही केली आहेत. पिकांचे नुकसान शेतकऱ्यांवरील कर्ज वाढवत आहे. यामुळे लाखो शेतकरी उपासमारीच्या वाटेवर असल्याचे पीकेआय अध्यक्ष  खालिद महमूद खोकहर यांनी म्हटले आहे. आता पाण्याची समस्या राष्ट्रीय संकट ठरले आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडत असल्याचे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेतकरी नेते अहमद शरीफ यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानची भारताला विनवणी

सिंधू जल करार पुन्हा लागू करण्यापासून पाकिस्तानने भारताला आतापर्यंत 4 पत्रं पाठविली आहेत. या पत्रांपैकी एक पत्र ऑपरेशन सिंदूरनंतर पाठविण्यात आले होते. चारही पत्रं पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सैयद अली मुर्तझा यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला पाठविली होती.  कराराच्या अंतर्गत पूर्वेकडील तीन नद्यांचे पाणी भारत वापरू शकतो. तर पश्चिमेकडील तीन नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानला अधिकार देण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.